-
करोनाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील मुस्लीम सामाजिक संस्था 'उम्मत' च्या सदस्यांनी शहरातील विविध धार्मिक स्थळांबाहेर निर्जंतुकीकरणाची मोहीम राबवली. ( सर्व छायाचित्र सौजन्य – अरुल होरायझन )
-
शहरातील श्रीमंत दगडशेठ हलवाई गणपती मंदिर, मंडई गणपती मंदिर आदी ठिकाणी संस्थेच्या सदस्यांनी स्वतः फवारणी केली.
-
संस्थेने राबवलेल्या या कार्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये एकजुटीचा संदेशही गेला.
-
पुण्यातील करोनाच वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही, यावेळी सांगण्यात आले.
-
शासनाच्यावतीन करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी धार्मिक स्थळांवर गर्दी करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
-
धार्मिक संस्ळांवर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते, त्यामुळे या ठिकाणी करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक होती. म्हणून शासनाकडून असा निर्णय घेण्यात आलेला आहे.

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”