-
पुणे शहराला करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा चांगलाच फटका बसला आहे. पुण्यातील काही भागात प्रशासनांने नियमांत शिथीलता आणली आहे, पण यासाठी नागरिकांना मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं या नियमांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलंय.
-
मात्र शहरातील काही भागात या नियमांचं पुणेकर सर्रास उल्लंघन करताना दिसत आहेत. Pune Cantonment Board च्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)
-
बाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क न लावणं, रस्त्यावर थुंकणं अशा गोष्टींसाठी पोलीस अधिकारी थेट दंडात्मक कारवाई करत आहेत.
-
अशाच एका नियम मोडणाऱ्या व्यक्तीला दंड भरावा लागला…
-
खबरदारीचा उपाय म्हणून नियम मोडणाऱ्या नागरिकांचं पोलीस अधिकारी चित्रीकरणही करत आहेत.
-
पोलिसांनी पकडल्यानंतर साहिजकपणे गयावया करणं, हात जोडणं हे आलंच..
-
पुणे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होते आहे.
-
काही नागरिक आपली चूक मान्य करत यापुढे नियमांचं पालन करण्याचं आश्वासन देत दंड भरत आहेत.
-
या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी लोकांनी नियम पाळणं गरजेचं आहे, याचसाठी ही कारवाई करण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”