-
पिंपरी-चिंचवड परिसरात सलूनची दुकानं उघडण्याची सशर्थ परवानगी देण्यात आली आहे. यानुसार रविवारपासून सलून व्यवसायकिांनी दुकानं सुरुही केली. मात्र नियमांवरुन अजुनही या व्यवसायिकांमध्ये संभ्रम पहायला मिळतोय. (सर्व छायाचित्र – कृष्णा पांचाळ आणि सागर कासार)
-
लॉकडाउन आणि करोना प्रादुर्भावाची भीती यामुळे फार कमी ग्राहक दुकानांमध्ये येत आहेत.
-
ग्राहकच येत नसल्यामुळे सलून दुकानधारक आणि कर्मचारी यांच्यासमोर अजुनही चिंतेचं कारण आहेच.
-
राज्य सरकारने अद्याप फक्त केस कापण्याची परवानगी दिली असून दाढी करण्याची परवानगी दिलेली नाही.
-
या नियमामुळे दुकानात कमी ग्राहक येत असून याचा धंद्यावर परिणाम होत असल्याचं सलून धारकांनी सांगितलं.
-
सरकारने आखून दिलेले सुरक्षेचे सर्व नियम आपण पाळत असून दाढी न करण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा अशी मागणी सलून दुकानधारक संघटनेने केली आहे.
-
दुसरीकडे पुणे शहरातली रविवारी सलूनची दुकानं सुरु झाली. दुकानाबाहेर ग्राहकांसाठी हात स्वच्छ करण्याकरता सॅनिटायजर मशिन लावण्यात आलेलं आहे.
-
तसेच आत आल्यानंतर प्रत्येक ग्राहकाचं थर्मल चेकींग केलं जात आहे.
-
केस कापताना आपल्या सुरक्षिततेसोबत ग्राहकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जात आहे.
-
मात्र पुण्यातही पहिल्या दिवशी फार कमी ग्राहकांनी सलूनच्या दुकानात येणं पसंत केलं.
-
शिल्ड मास्कसह सर्व खबरदारीचे उपाय सलून व्यवसायिक घेत आहेत, पण करोनामुळे निर्माण झालेली भीती कमी होण्यासाठी काही कालावधी जाईल असं या व्यवसायिकांचं म्हणणं आहे.
-
गेल्या दोन-तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ ही दुकानं बंद असल्यामुळे यांच्या धंद्यावर चांगलाच परिणाम झाला आहे.
-
त्यातच पुणे आणि लगतच्या परिसरात करोनाचे वाढते रुग्ण पाहता, सरकार या दुकानांसाठीची परवानगी कधी रद्द करु शकते. त्यामुळे सलून व्यवसायिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण कायम आहे.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल