-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. (संग्रहित- एक्स्प्रेस फोटो)
-
राज्य सरकार ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत लॉकडाउन शिथील करत असताना सर्वात प्रथम भिवंडीत लॉकडाउन जाहीर करण्यात आला. भिवंडीत १५ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. १८ जून ते ३ जुलैपर्यंत भिवंडी शहर पूर्पणणे बंद असणार आहे. प्रतिकात्मक (एक्स्प्रेस फोटो-अमित चक्रवर्ती)
-
भिवंडी शहरात दाटीवाटीची वस्ती असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळणं कठीण होत आहे. करोनाचा फैलाव वाढत असल्याने महापौर प्रतिभा पाटील यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करोनाची साखळी तोडण्यासाठी १५ दिवसांचा क़डक लॉकडाउन जाहीर केला पाहिजे असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्वांनीच पाठिंबा दिला. प्रतिकात्मक (एक्स्प्रेस फोटो-अमित चक्रवर्ती)
-
भिवंडी शहरातील सर्व रस्ते पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद आहेत. फक्त मेडिकल आणि दूध, किराणा दुकानं ठराविक वेळेसाठी सुरु आहेत. (संग्रहित फोटो)
-
भिवंडीनंतर अंबरनाथमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. (संग्रहित फोटो)
-
अंबरनाथमध्येही संपूर्ण लॉकडानची घोषणा करण्यात आली असून ३० जूनपर्यंत निर्बंध लागू असणार आहेत. (संग्रहित फोटो)
-
करोनाचा फैलाव टाळण्यासाठी शहरातील गर्दी कमी करण्याच्या उद्धेशाने शहरातील सर्व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्यात आल्या आहेत. दूध, फळे, पालेभाज्या यांची घरपोच सेवा व दवाखाने सुरु आहेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावंर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. प्रतिकात्मक (एक्स्प्रेस फोटो-अमित चक्रवर्ती)
-
अंबरनाथनंतर नवी मुंबईत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. (संग्रहित फोटो)
-
नवी मुंबईत कंटेनमेंट झोन असणाऱ्या सर्व ठिकाणी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. एका आठवड्यासाठी हा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. २९ जून ते ५ जुलैपर्यंत लॉकडाउन लागू असणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापलिका आयुक्क तसंच पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर या निर्णयाची घोषणा केली. (एक्स्प्रेस फोटो)
-
कंटेनमेंट झोनची यादी – बेलापूरमधील दिवाळे आणि कराळे गाव; तुर्भे येथील तुर्भे स्टोअर्स, तुर्भे सेक्टर आणि तुर्भे गाव; वाशीमध्ये जुहू गाव सेक्टर ११; कोपरखैरणे येथील १२ खैरणे आणि बोनकोडे; घणसोलीतील रबाळे गाव; ऐरोलीतील चिंचपाडा. प्रतिकात्मक (एक्स्प्रेस फोटो-विशाल श्रीवास्तव)
-
नवी मुंबईनंतर रत्नागिरीत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. (संग्रहित फोटो)
-
परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी लॉकडाउन पुन्हा लागू करण्यात आला आहे. १ ते ८ जुलै या काळात संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली. जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. (संग्रहित फोटो)
-
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 'ब्रेक द चेन' अंतर्गत मंगळवार ३० जून नंतर ८ दिवसांचा कडक लॉकडाउन लावण्यात येईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. प्रतिकात्मक (एक्स्प्रेस फोटो-विशाल श्रीवास्तव)
-
लॉकडाउन जाहीर कऱण्यात आलेलं पाचवं शहर ठाणे आहे. (संग्रहित फोटो)
-
१ जुलैपासून ठाणे महापालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाउन लागू होणार आहे. यावेळी लॉकडाउन एकचे सगळे नियम आणि निर्बंध पुन्हा लागू केले जाणार आहेत. ठाणे पोलीस आणि ठाणे महापालिका आयुक्तांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाउन पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रतिकात्मक (एक्स्प्रेस फोटो-निर्मल हरिंद्रन)
-
-
याशिवाय करोना संक्रमण आटोक्यात येत नसल्याने पूर्व उपनगरातील भांडुपमध्ये सुरू असलेल्या टाळेबंदीचा कालावधी ५ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. सध्या रुग्णसंख्येत भांडुप मुंबईत चौथ्या क्रमांकावर असून, या भागात दररोज १०० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. प्रतिकात्मक (एक्स्प्रेस फोटो-निर्मल हरिंद्रन)
-
दरम्यान राज्याबद्दल बोलायचं गेल्यास ठाकरे सरकारने लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली असून ‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. यामुळे ३० जूननंतर सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत. (फोटो-सीएमओ)

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल