-
संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रात करोना विषाणूचं सावट कायम आहे. पुणे शहरालाही या विषाणूचा चांगलाच फटका बसला आहे. प्रादूर्भाव कमी असलेल्या भागांमध्ये प्रशासनाने दुकानं उघडण्यास परवानगी दिली आहे, मात्र बाजारपेठेवर अद्याप करोनाचं सावट कायम असल्याचं पहायला मिळतंय. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)
-
सदाशिव पेठ भागातील कुमठेकर रस्त्यावर कपड्याची दुकानं सुरु झाली आहेत, दुकानाबाहेरील मॅनिक्विन्सलाही दुकानदारांनी असे मास्क घालून ठेवले आहेत.
-
सोशल डिस्टन्सिंगसह, स्वच्छता, गर्दी न होऊ देणं असे अनेक नियम स्थानिक प्रशासनाने दुकानदारांना घालून दिले आहेत.
-
एरवी महिला वर्गाचा कपड्यांच्या दुकानात खरेदी करण्याकडे ओढा असतो, मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता त्यांनीही आपल्या हौसेला मुरड घालण्याचं ठरवलंय.
-
एखादा चांगला ड्रेस, साडी दिसली की अनेक महिलांना तो घेण्याचा मोह होतो, या महिलेच्या मनातही असेच काहीसे भाव असावेत…
-
पुढचे काही दिवस ग्राहक प्रत्यक्ष दुकानात येऊन खरेदी करण्याला प्रतिसाद देतील की नाही याबद्दल शहरातील दुकानदारही साशंक आहेत.

महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल