-
करोनाचा धोका अद्याप टळला नसला, तरी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आता जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानासह इतर दुकानेही खुली झाली आहेत. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या आणि प्रमुख शहरात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने नव्याने उघडण्यात येणाऱ्या दुकानांमध्ये विशेष काळजी घेण्यात येत आहे. (सर्व फोटो – आशिष काळे)
-
सलून सुरू झाल्यानंतर आता महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ब्युटीपार्लरची दुकानही सुरू झाली आहेत.
-
१ जुलै पासून पुण्यातील कोथरूड परिसरात ब्युटी पार्लरची दुकाने सुरू झाली.
-
ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी काम करताना आवश्यक ती दक्षता घेतलेली दिसून आली.
-
ब्युटी पार्लर मधील महिलांनी पीपीई किट परिधान करून मगच कामाला सुरुवात केली. तसेच दुकानातील सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरण करूनच इतर महिलांना दुकानात प्रवेश देण्यात आला.

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”