-
लॉकडाउनच्या काळात तीन महिने बंद असलेला हॉटेल आणि लॉजिंग व्यवसाय आजपासून (८जुलै) अटीशर्तींसह पुन्हा होत आहे. दरम्यान, कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हॉटेलांमधील खोल्यांची निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. (सर्व छायाचित्रे – अरुल होरायझन)
-
पुण्यातील शिरोळे रोडवरील तरवडे हॉटेलमध्ये अशा प्रकारे निर्जंतुकीकरण करण्यात आले. यावेळी कामगारांनी पीपीई किट परिधान केले होते.
-
हॉटेलमधील लॉबी खोल्यांमधील बेड, फर्निचर, टॉयलेट अशा सर्व ग्राहकांच्या वापराची ठिकाणं आणि वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
-
राज्यात सर्वत्र हॉटेल सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी अनेक नियमांचे पालन हॉटेल प्रशासनाला आणि इथे येणाऱ्या ग्राहकांना करावे लागणार आहे.
-
हॉटेलांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फेस मास्क, ग्लोव्ह्ज, सॅनिटायझर यांचा वापर बंधनकारक आहे.
-
मास्क आणि फिजिकल डिस्टंसिंगचे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे.
-
हॉटेलमध्ये प्रवेश करणाऱ्या ग्राहकांना शरिराचे तापमान तपासणे आवश्यक आहे.
-
ग्राहकाच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप बंधनकारक असणार आहे.
-
कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे हॉटेलांमध्ये गर्दी टाळण्यासाठी हॉटेल किंवा लॉज प्रशासनाला केवळ ३३ टक्केच बुकिंग घेता येणार आहे
-
हॉटेलमध्ये ज्या ग्राहकांना रहायचं आहे अशांनाच हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

IND vs PAK: वर्षानुवर्षांची परंपरा मोडली? आधी हस्तांदोलनास नकार अन् आता…; पाकिस्तानविरूद्ध फायनलपूर्वी भारताचा मोठा निर्णय