-
करोना विषाणूचा विळखा आणि पावसाळा….सध्या स्वच्छता विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दुहेरी जबाबदारी आहे.
-
पावसाळ्यात शहरांत ड्रेनजचं पाणी रस्त्यावर येऊन अनेक साथीचे आजार आणि परिसरात दुर्गंधी पसरण्याचे प्रकार होत असतात. पुण्यात महापालिकेजवळील रस्त्यावर ड्रेनेजचं काम करताना स्वच्छता विभागाचे कर्मचारी. (सर्व छायाचित्र – अरुल होरायझन)
-
अनेकदा हे काम करत असताना या कर्मचाऱ्यांना ड्रेनेजमध्ये उतरावं लागतं, पण शहरं स्वच्छ राखायचं असेल तर हे काम करणंही गरजेचं असतं. फारशी प्रसिद्धी न मिळताही आपलं कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचं कौतुक करायलाच हवं.
-
सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व कर्मचारी फेसमास्क आणि इतर सर्व नियम पाळत हे काम करत आहेत.
-
अनेकांना शहरातील चमकणारे रस्ते, गजबजाट यांचं आकर्षण असतं. शहराचं हे रुप कायम राखण्यासाठी यांच्यासारखे कर्मचारी कसलीही अपेक्षा न बाळगता आपलं कर्तव्य बजावत असतात. खऱ्या अर्थाने हे कर्मचारी भारताचे स्वच्छतादूत आहेत.

“एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईला जाऊन…”, मराठा आंदोलनावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एकच माणूस…”