-
पुणे शहरात करोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा केली आहे. आज मध्यरात्रीपासून लॉकडाउन लागू होणार असल्यामुळे पुणेकरांनी जिवनावश्यक वस्तू आणि भाजीखरेदीसाठी अक्षरशः झुंबड केली होती. (छायाचित्र सौजन्य – पवन खेंगरे आणि आशिष काळे)
-
लॉकडाउनमध्ये सुरुवातीचे काही दिवस कठोर निर्बंध असल्यामुळे प्रत्येक नागरिक जास्तीत जास्त साठा करुन ठेवण्याचा प्रयत्न करतोय.
-
पुणे मार्केटयार्ड परिसरात सकाळी अशी गर्दी दिसून येत होती.
-
भाजीवाल्यांसमोर झालेली गर्दी….
-
सध्याच्या खडतर काळात सोशल डिस्टन्सिंग पाळणं अत्यंत गरजेचं आहे. परंतू गेल्या काही दिवसांमध्ये पुणेकरांनी या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचं पाहण्यात आलं होतं.
-
अनेक नागरिक बाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क लावत नसल्याचं पहायला मिळालं. अशाच काही बेजबाबदार नागरिकांमुळे शहरात रुग्णसंख्या वाढल्याचं स्थानिक प्रशासनाचं म्हणणं आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून अनेक पुणेकर नागरिकांना करोनाशी लढताना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
-
अशाच गर्दीमुळे शासनाला पुन्हा एकदा लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागला आहे.
-
तुळशी बाग परिसरात पोलिसांनी बांबू लावून केलेलं बॅरिकेटींग ओलांडून खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेले पुणेकर नागरिक
-
तुळशी बागेचा परिसरही असा गजबजलेला पहायला मिळाला होता.
-
फुलं खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेले ग्राहक…

IND vs PAK: वर्षानुवर्षांची परंपरा मोडली? आधी हस्तांदोलनास नकार अन् आता…; पाकिस्तानविरूद्ध फायनलपूर्वी भारताचा मोठा निर्णय