-
सध्या जगभर करोनाचं थैमान सुरु असताना माणसांच्या करोना चाचण्या करण्यात येत असल्याचे फोटो वारंवार पहायला मिळत आहेत. त्यातच एका गोरीला माकडाचीही करोनाची चाचणी करण्यात आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Photos : Ron Magill Conservation Endowment (zoo miami)
-
अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील लॅबमध्ये चाचणीसाठी दाखल झाल्याचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
-
हा साधासुधा रुग्ण नसून प्रचंड आकाराचा आणि १९६ किलो वजनाच्या एक गोरिला माकड आहे.
-
विशेष म्हणजे लॅबमध्ये इतर चाचण्यांबरोबरच या गोरिलाची करोनाची चाचणी देखील करण्यात आली.
-
गोरिलावर उपचार करणं हे डॉक्टरांसाठी देखील एक मोठं आव्हानंच होतं.
-
शांगो नावाचा हा गोरिला मियामी-दाडे प्राणीसंग्रहालयात (झू मियामी) वास्तव्यास असून या प्राणी संग्रहालयातील त्याचा छोटा भाऊ बर्नी याच्याबरोबर त्याची मोठी हाणामारी झाली.
-
यामध्ये ३१ वर्षीय शांगो गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला वैद्यकीय चाचण्यांसाठी एका लॅबमध्ये नेण्यात आले.
-
या ठिकाणी त्याला भूल देऊन त्याचा एक्स-रे, अल्ट्रासाउंड, टीबीची चाचणी आणि सर्वांत महत्वाचं कोविड-१९ची चाचणी देखील करण्यात आली.
-
सुदैवानं त्याची कोविडची चाचणी निगेटिव्ह आली आहे.
-
शांगो आणि त्याचा भाऊ बर्नी या दोघांना सन २०१७ मध्ये झू मियामीमध्ये दाखल करण्यात आलं.
-
त्यांना सॅनफ्रॅन्सिस्को झूमधून येथे आणण्यात आलं होतं. त्यांचा जन्मही येथेच झाला होता.
-
पूर्ण वाढ झालेल्या गोरिलांमधील भांडण हे साधारण भांडण नसतं. इतर वेळी शांगो आणि बर्नी हे एकमेकांपासून दूर राहून चांगलं राहत होते.
-
अचानक त्यांच्यामध्ये इतकं मोठं भांडण कसं झालं याचं प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनाही आश्चर्य वाटत आहे.
-
या दोघांचं भांडण एकमेकांना शारिरीक इजा करुनच थांबलं. यामध्ये शांगोच्या एका हाडालाही फ्रॅक्चर झालं आहे.
-
या भांडणामध्ये शांगोच्या शरिरावर चावल्याच्या मोठ्या जखमा झालेल्या होत्या.
-
शरिरावर मोठ्या जखमा झाल्याने शांगोवर वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
-
वैद्यकीय तपासणीनंतर शांगोला पुन्हा प्राणीसंग्रहालयात नेण्यात आले असून त्याला निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
-
येथील त्याच्या भावाला दुसऱ्या ठिकाणी हालवण्यात आले आहे.
-
विशेष म्हणजे करोना हा विषाणू प्राण्यांमधून प्राण्यांमध्ये संक्रमण करणारा असला तरी आता त्याचं प्राण्यांमधून माणसांमध्ये संक्रमण सुरु झाल असून त्यामुळे जगात सर्वत्र हाहाकार माजला.
-
चीनमधील वुहान शहरातून हा विषाणू जगभर पसरल्याचे सांगण्यात येत आहे. वटवाघुळातून हा विषाणू माणसांमध्ये पसरल्याचा संशोधकांचा दावा आहे.

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला