-
संपूर्ण देशासह मुंबईलाही अजुन करोना विषाणूचा विळखा कायम आहे. प्रत्येक दिवशी करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
-
वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका आणि आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहे. मुंबईच्या प्रत्येक वस्तीमध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी नागरिकांच्या करोना चाचणी करत आहेत. (सर्व छायाचित्र – अमित चक्रवर्ती)
-
मुंबईच्या ट्रॉम्बे येथील चिता कँप भागात आरोग्य विभागाने नागरिकांसाठी करोना चाचणी कँपचं आयोजन केलं होतं.
-
चाचणीदरम्यान सर्व अधिकारी पीपीई किटसोबत सर्व अद्ययावत उपकरणांसह आपलीही काळजी घेत आहेत.
-
करोना चाचणीसंदर्भात अनेक महत्वाच्या सूचना तज्ज्ञ मंडळी करत आहेत. संपूर्ण शहर टाळेबंद करण्यापेक्षा जिथे मोठय़ा प्रमाणात बाधित आढळत आहेत तेथे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे आहे. तरच टाळेबंदीकडून, अंशत: टाळेबंदीकडे, तिथून अतिसंक्रमित क्षेत्राकडे आणि तिथून पुढे इमारतींकडे आपण येऊ असे राज्याच्या करोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितले.
-
करोनाच्या लसीसाठी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचे डॉ. ओक यांनी स्पष्ट केले.
-
दरम्यान मुंबईकरांसाठी महापालिकेने पालिका दवाखान्यांत मोफत करोना चाचणीची सोय केलेली आहे.
-
मुंबई महापालिकेच्या डी विभागात नायर रुग्णालयात सध्या करोना रुग्णावर उपचार सुरू आहेत. नायर रुग्णालयात संसर्ग होण्याचा धोका असल्याने अनेक जण चाचणीसाठी तेथे जाणे टाळतात. त्यामुळे अनेकांना खासगी प्रयोगशाळांमध्ये पैसे भरून चाचणी करून घ्यावी लागली आहे. मात्र आता ‘डी’ विभाग कार्यालयाने ग्रॅन्ट रोड येथील नाना चौक परिसरातील जगन्नाथ शंकरशेठ पालिका शाळेतील दवाखान्यात विनामूल्य चाचणीची सुविधा उपलब्ध केली आहे.

प्रत्येकाचा हिशोब उघडणार! साडेसाती असलेल्या ‘या’ लोकांची शनी महाराज नोव्हेंबरपासून खरी परीक्षा घेणार? कुणाच्या नशिबातील सुख हरपणार?