-
वाढती रुग्णसंख्या पाहता पुणे शहरात प्रशासनाने पुन्हा एकदा लॉकडाउन घोषित केला. परंतू तरीही अद्याप शहरातली करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात येण्याचं चिन्ह दिसंत नाहीये. (सर्व फोटो – आशिष काळे)
-
पुण्याच्या पु.ल.देशपांडे उद्यानात कोविड चाचणी केंद्र उभारण्यात आलं आहे. सिंहगड रस्त्यावरील नागरिकांनी या केंद्रावर आपली चाचणी करुन घेण्यासाठी हजेरी लावली होती.
-
पुण्यात बुधवारी १ हजार ७५१ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले. त्यामुळे शहराची रुग्णसंख्या आता ४२ हजाराच्या वर पोहचली आहे.
-
बुधवारी दिवसभरात ३३ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. मात्र पुणे शहरात याचा काहीकेल्या फरक पडताना दिसत नाहीये.
-
आतापर्यंत १ हजार ६८ नागरिकांना करोनाशी लढताना मृत्यू झाला आहे.
-
करोनावर उपचार घेणार्या ८८३ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्यांना बुधवारी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत २५ हजार १२९ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

भाजपाचा बालेकिल्ल्यातच पराभव, काँग्रेसचा दणदणीत विजय; नगरपालिकेवर कशी मिळवली सत्ता?