-
विमानवाहू युद्धनौका 'आयएनएस विराट'च्या अखेरच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.
-
या युद्धनौकेने ३० वर्ष भारतीय नौदलात सेवा बजावली. 'आयएनएस विराट'ला २०१७ साली नौदलातून सेवानिवृत्त करण्यात आले.
-
शनिवारी आयएनएस विराट' ही युद्धनौका गुजरातमधील अलंग बंदराच्या दिशेने रवाना झाली.
-
अलंग बंदरात जहाजांची विल्हेवाट लावली जाते. म्हणजे जहाज तोडले जाते. भारतीय नौदलाची ही युद्धनौका रविवारी रात्रीपर्यंत भावनगर येथे पोहोचेल.
-
२०१७ साली सेवानिवृत्त झाल्यानंतर आयएनएस विराटला अलंगच्या श्रीराम ग्रुपने लिलावात ३८.५४ कोटी रुपयांना खरेदी केले. मुंबईच्या नेवल डॉकयार्डमध्ये ही युद्धनौका उभी होती.
-
"आयएनएस विराटमध्ये उच्चप्रतीचे स्टील वापरण्यात आले आहे. यात बुलेटप्रूफ मटेरियल सुद्धा आहे" असे आयएनएस विराटची खरेदी करणारे श्रीराम ग्रुपचे चेअरमन मुकेश पटेल यांनी सांगितले.
-
भारतीय नौदलात ३० वर्ष सेवा बजावण्याआधी आयएनएस विराट यूकेच्या रॉयल नेव्हीमध्ये होते. तिथे HMS Hermes असे या जहाजाचे नाव होते. भारतीय नौदलाने या युद्धनौकेला आयएनएस विराट हे नाव दिले. भारतीय नौदलात १९८७ साली आयएनएस विराटचा समावेश झाला.
-
आयएनएस विराटचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संग्रहालय, हॉटेलमध्ये बदलण्याचा प्रयत्न झाला. पण यातली एकही योजना यशस्वी होऊ शकली नाही. टाइम्स नाऊने हे वृत्त दिले आहे.
-
आयएनएस विराटमधील मटेरिअलचा मोटरबाइक्स बनवण्यामध्ये वापर होऊ शकतो. लिलावात ही विमानवाहू युद्धनौका खरेदी करणाऱ्या कंपनीने माहिती दिली आहे. अमर उजालाने हे वृत्त दिले आहे.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल