-
श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा गडावरील गुप्त शिवलिंगाचे दरवाजे बुधवारी मध्यरात्री उघडण्यात आले. वर्षातून फक्त महाशिवरात्रीला ही गुप्त शिवलिंगे उघडली जातात. प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार मोजके पुजारी व मानकरी यांच्या हस्ते तिन्ही शिवलिंगावर अभिषेक-पूजा करण्यात आली. शिवलिंगाचे दर्शन घेताना गर्दी होऊ नये म्हणुन यात्रेवर बंदी घालण्यात आली होती.
-
खंडोबाच्या मुख्य उत्सवापैकी महाशिवरात्रीला वेगळे महत्व आहे.त्रिलोकातील दर्शनाचा लाभ यावेळी घेता येतो. मंदिराच्या शिखरातील शिवलिंगाला स्वर्गलोक तर मुख्य मंदिरातील स्वयंभूलिंगाला भूलोक व गाभार्यातील भुगर्भात असलेल्या शिवलिंगाला पाताळलोक समजले जाते. (जेजुरी मुख्य मंदिरात असलेले पाताळातील शिवलिंग)
-
जेजुरीत जमावबंदीचा आदेश लागू केल्याने शुकशुकाट जाणवत होता.पोलिस प्रशासनाने खंडोबागडाकडे जाण्यार्या पायर्यांवरच लोखंडी कठडे उभारल्याने कोणीही गडावर गेले नाही.
-
महाशिवरात्रीला त्रिलोकातील दर्शनासाठी हजारो ग्रामस्थ, भाविक रात्रीपासूनच गडावर गर्दी करतात. चार-पाच तास रांगेत उभे राहतात. यंदा मात्र गड भाविकांविना सुनासुना वाटत होता. कोठेही बेल-भंडार्याची उधळण नाही की सदानंदाचा येळकोट असा जयघोष नाही अशा वातावरणातच यंदाचा महाशिवरात्री उत्सव पार पडला. (मुख्य मंदिरातील शिवलिंग याला भूलोकीचे शिवलिंग म्हणतात)
शुक्रवारी (दि.१२) मध्यरात्री तिन्ही शिवलिंगाचे पूजन होऊन दोन कळसातील व भुगर्भातील शिवलिंग मंदिर बंद करण्यात येणार आहे.शनिवारपासून (दि.१३) भाविकांना मुखदर्शनासाठी मंदिर खुले होणार आहे. (मुख्य मंदिराच्या कळसामध्ये असलेले स्वर्गलोकीचे शिवलिंग)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case