-
राज्यातील काही शहरांमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. राज्यात रविवारी १६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले. त्यामुळे दिवसेंदिवस सरकारची झोप उडत चाललेली असताना मुंबईतील दादरच्या रस्त्यांवर झालेली गर्दी. (छायाचित्रं :एएनआय)
-
सरकारकडून सातत्यानं नागरिकांना दक्षता घेण्याचं आवाहन केलं जात आहे. सध्याच्या परिस्थितीत तरी करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण व निर्बंधांचे पालन करणे हाच उपाय आहे, असं वैज्ञानिकांकडून सांगितलं जात आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचंच या दृश्यातून दिसत आहे.
-
मुंबईतील रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत असताना वर्दळीचा भाग असलेल्या दादरमधील ही गर्दी चिंतेत भर घालणारी ठरू शकते.
-
मुंबईत रविवारी १,९६२ रुग्ण आढळून आले. वाढत चालेल्या रुग्णसंख्येचा नागरिकांवर कोणताही परिणाम होत नसल्याचं दिसून येत आहे.
-
मुंबईपेक्षाही नागपूरमध्ये करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यात सात दिवसांत करोनाचे रुग्ण ११,७९२ रुग्ण आढळून आले. या रुग्णसंख्येमुळे नागपूरमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी मुख्य रस्त्यांवर असा शुकशुकाट होता.
-
नागपूरमध्ये एका आठवड्याचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. वाढती रुग्णसंख्या आणि गर्दी यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
-
गेल्या सात दिवसांत विदर्भातील नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ६४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात जिल्ह््याच्या बाहेरून नागपुरातील विविध रुग्णालयांत दगावलेल्या काही रुग्णांचाही समावेश आहे.
-
आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार विदर्भात ७ ते १३ मार्च २०२१ या कालावधीत करोनाचे २६ हजार ५७१ नवीन रुग्ण आढळले. त्यातील ४४.३७ टक्के हे एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत. (छायाचित्रं :एएनआय)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक