-
वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांनी 'भजन सत्याग्रह'चा पवित्रा घेतला असून देहूगावच्या वेशीवर बीज सोहळ्याच्या दिवशी दोनशेच्या जवळपास वारकरी भजन करत आंदोलन केलं. (सर्व फोटो : कृष्णा पांचाळ/ लोकसत्ता डॉट कॉम)
-
बीज सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांनी देहूत यावं असं आवाहन बंडातात्यांनी नुकतंच केलं होतं. त्यानुसार आज देहूच्या वेशीवर महाराष्ट्राच्या काही भागातून वारकरी आले.
-
करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानात केवळ ५० लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
-
मात्र वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांनी या निर्णयाविरोधात देहूच्या वेशीवर आंदोलनाची हाक दिलीय. त्यामुळे शेकडो वारकरी देहूच्या वेशीवर जमले
-
भजन करत शांततेच्या मार्गाने वारकरी आंदोलनाद्वारे आपले म्हणणे मांडताना दिसले.
-
आंदोलनादरम्यान दुपारी पाच वाजेपर्यंत तरी बंडातात्यांनी आपली पुढील भूमिका देहूच्या वेशीवरुन वारकऱ्यांना संबोधित करताना मांडलेली नव्हती.
-
या आंदोलनात वारकाऱ्यांकडून कोरोना संदर्भातील सोशल डिस्टसिंग आणि मास्क वापरण्याच्या नियमांचे पालन केलं जात असल्याचं पाहायला मिळालं.
-
पोलिसांना निवेदन देऊन आंदोलनाचा समारोप होणार असल्याचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितलं आहे.
-
बंडातात्यांनी केलेल्या आवाहानानंतर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.
-
बंडातात्यांसोबत शेकडो वारकरी चालत देहूगावाच्या वेशीजवळ पोहचले आणि पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीसमोर आंदोलन करत बसले.
-
तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवासहीत अनेक अंभग गात हे वारकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
-
टाळ वाजवत, भजनं म्हणत, दोन माणसांमध्ये तीन फुटांचं अंतर ठेवत, मास्क घालून, शांतेतनं कोणत्याही चेतावणीच्या घोषणा दिल्या जाणार नाहीत, असं बंडोतात्यांनी आधीच जाहीर केलेलं.
-
बंडातात्यांनी दिलेल्या शब्दानुसारच विठ्ठलाच्या भक्कीत लीन होत वारकरी देहूगावच्या वेशीपर्यंत पोहचले.
-
पोलीस आमच्या समाजाला जिथे आवडतील तिथे आहे त्या ठिकाणी बसण्याची आमची तयारी आहे, असंही बंडातात्यांनी हे आंदोलन सुरु करण्याच्या आधीच सांगितलं होतं.
-
दुपारी तीन वाजल्यापासून ऐन उन्हात बसून वारकरी भजन सत्याग्रह करतानाचे चित्र दिसलं.

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी