-
सहनशीलता ठेवा : चंद्राचे भ्रमण षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे होत आहे. दोलायमान परिस्थितीतून चाललेले मन स्थिर करण्याचा प्रयत्न करा. दर वेळीप्रमाणे एकाच बाजूचा विचार करणे इष्ट ठरणार नाही. पौर्णिमा सप्तमस्थानातून होत असून स्पर्धात्मक गोष्टींच्या मागे धावू नका. नोकरदार वर्गाला नवीन प्रस्तावासाठी वाट पाहावी लागेल. जुना अनुभव विसरून चालणार नाही. सध्याचा कालावधी स्वीकारून पुढे जावे लागेल. व्यापारी क्षेत्रामध्ये जे चालू आहे त्यातच समाधान माना. नवीन गोष्टींचा व्याप न वाढवणे योग्य ठरेल. आर्थिक बाबतीत उधार- उसनवारी करणे टाळा. खर्चाची बाजू सांभाळून बचत करण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक उद्भवणाऱ्या अडचणींना धीराने सामोरे जा. मानसिकदृष्ट्या सहनशीलता ठेवा. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा व आरोग्याची काळजी घ्या. शुभ दिनांक : ३०, १ महिलांसाठी : मानसिक ताण घेऊ नका. (स्मिता अतुल गायकवाड)
-
धावपळ करणे टाळा : पौर्णिमा षष्टस्थानातून होत आहे. या कालावधीत आध्यात्मिक गोष्टीमध्ये मन रमवून मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न करा. चंद्र ग्रहाची अनुकूलता वाढवणारी नसली तरी वाईटही नाही. सामंजस्याने कोणतीही गोष्ट केल्यास त्रास होणार नाही. हे लक्षात ठेवून पुढील कार्यपद्धती हाताळा. नोकरदार वर्गाला थोडे कष्ट वाढवावे लागतील. कामातील त्रुटी भरून काढणे योग्य राहील. प्रत्येक पाऊल घाईने टाकून चालणार नाही. व्यापारी क्षेत्रात धावपळ करणे टाळा. उत्पादनवाढीसाठी मोठी गुंतवणूक करण्याची ही वेळ नाही. ठरवलेल्या नियोजनात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक ताण न घेता खर्च कसा कमी होईल याकडे लक्ष द्या. जाहिरात माध्यमांचा वापर योग्य कारणासाठी करा. वैवाहिकदृष्ट्या जोडीदाराशी मतभेद टाळा. प्रकृती जपा. शुभ दिनांक : २५, २९ महिलांसाठी : शांत विचार करून कृती करा.
-
ज्येष्ठांची मदत होईल : पंचमस्थानातून होणारी पौर्णिमा शुभ फळ देणारी ठरेल. भाग्यस्थानातील गुरू नेपच्यून यांचा चंद्राशी होणारा योग स्पर्धात्मक गोष्टीत यश मिळवून देईल. संशोधनात्मक कार्याला मोठी गती मिळेल. शासकीय कर्मचारी वर्गाला थोडा विरंगुळा मिळेल. अनेक दिवस कमी वेळेत काम पूर्ण करण्याची कसरत कमी होईल. थोडी विश्रांती मिळाल्याने मन प्रसन्न राहील. छोट्या-मोठ्या घरगुती व्यवसायांना प्रतिसाद उत्तम राहील. ग्राहकांना संतुष्ट करण्यासाठी राबवलेल्या योजना यशस्वी होतील. कामाचे सर्व नियंत्रण अचूक साधण्यात ज्येष्ठांची मदत होईल. आर्थिकदृष्ट्या आवक चांगली असेल. सामाजिक संकल्पनेचा हेतू साध्य होईल. मित्रमंडळींचे सहकार्य मिळेल. मुलांसोबत करमणूक होईल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. शुभ दिनांक : २५, १ महिलांसाठी : धाडसी व पराक्रमी वृत्ती राहील.
-
महत्त्वाकांक्षा वाढेल : शुभ ग्रहांचा प्रभाव चांगला राहील. पौर्णिमा चतुर्थस्थानातून होणारी आहे. पौर्णिमा कालावधीत वृद्ध व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. नोकरदार व्यक्तींना ज्येष्ठ व्यक्तींचा पाठिंबा चांगला राहील. सतत असलेला कामाचा भार पार पाडाल. जबाबदारी वाढल्याने कामाचे परिश्रम वाढतील. व्यावसायिकदृष्ट्या सरळमार्गी वाटचाल महत्त्वाकांक्षा वाढवणारी ठरेल. आतापर्यंत असलेल्या अनुभवाच्या जोरावर कामकाजाचा आराखडा ठरवून काम करा. सध्या वाढीव उत्पादन वाढवणे टाळा. व्यावसायिक कर्जफेड कमी करण्याचा प्रयत्न करा. पैशांच्या बाबतीत तिढा सुटणार असला तरी त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने करा. सामाजिक क्षेत्रातील कारकीर्द उत्तम असेल. नातेवाईकांविषयी असलेला जिव्हाळा दृढ होईल. मुलांच्या आरोग्याचे प्रश्न वेळीच हाताळा. शारीरिकदृष्ट्या चांगले बदल घडतील. शुभ दिनांक : २५, २९ महिलांसाठी : संघर्षाचे वातावरण कमी होईल.
-
नवे विचार प्रगतिकारक : पराक्रमस्थानातून होणारी पौर्णिमा विकास घडवणारी असेल. थांबलेल्या गोष्टींना गती मिळण्यासाठी सध्याचा कालावधी पूरक ठरेल. नोकरदार व्यक्तींनी नेमक्या ठोकताळ्यांचा वापर केल्यास अनेक गोष्टींना दुजोरा मिळेल. अनेक क्षेत्रात नवे विचार प्रगतिकारक ठरतील. व्यावसायिक स्तरावर गिरण्या, कारखाने, छापखाने, वेगवेगळ्या तेलांचे व्यापारी यांची अजूनही कोंडी कमी झालेली नाही. मात्र ठरावीक कालावधीनंतर उसंत मिळेल. उद्योग-व्यवसायातील जुना अनुभव विसरून चालणार नाही. आर्थिक बाबतीत होणारी कुचंबणा कमी होईल. बचतीत वाढ होईल. राजकीय क्षेत्रात सुधारित धोरण राबवण्यासाठी कार्यतत्पर राहाल. घरातील सदस्यांना विश्वासात घेऊन काम करा. उपासनेत मन रमवा. मनस्ताप होणाऱ्या गोष्टींपासून लांब राहा. शारीरिकदृष्ट्या प्रकृती ठणठणीत राहील. शुभ दिनांक : २५, १ महिलांसाठी : कामातील उत्साह टिकवून ठेवा.
-
अनुकूल विकास घडेल : पौर्णिमा धनस्थानात होत आहे. सकारात्मक ऊर्जा वाढेल. अनेक दिवस तग धरून राहिलेले वादळ संपण्याच्या मार्गी असेल. सुखाच्या राहणीमानात वाढ होईल. नोकरदार वर्गाला प्रशासकीय कामातील अडचणी कमी होतील. जबाबदारी योग्यरीत्या पार पडल्याने अधिकारीवर्ग तुमच्या कामाची दाद देतील. हा सुखद क्षण मनाला उभारी आणणारा असेल. व्यवसायात होणारा अटीतटीचा गोंधळ थांबेल. व्यावहारिकदृष्ट्या उत्पादनातील व्यवहार रोखीच्या स्वरूपात करा. व्यावसायिकदृष्ट्या अनुकूल विकास घडेल. येणारा खडतर काळ दूर होईल. इतरांवर अवलंबून राहण्याचा कालावधी संपेल. आर्थिक घडामोडी चांगल्या राहतील. राजकीय क्षेत्रात मानसन्मान मिळेल. कुटुंबातील वातावरण खेळीमेळीचे असेल. मानसिक स्थैर्य उत्तम राहील. जुन्या व्याधींचा त्रास कमी होईल. शुभ दिनांक : २५, २६ महिलांसाठी : साहचार्याने वागण्याचा निर्णय यशस्वी होईल.
-
अपेक्षित परिणाम मिळेल : पौर्णिमा तुमच्याच राशीतून होत आहे. धाडस व कामातील परिश्रम दोन्हींचा मेळ आता जमणार आहे. नोकरदारवर्गाला कामाचा अंदाज येणे सोपे होईल. दडपणाखालील कामाचे स्वरूप बदलेले असेल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत वेळ घालवू नका. व्यावसायिकदृष्ट्या उत्साह वाटला नाही तरी जोखीम स्वीकारून काम करावे लागेल. नित्यनियम धरून हालचाल करा. व्यावसायिक चढ-उतार आशादायक राहील. अनावश्यक खर्चाला आळा घातल्यास आर्थिकदृष्ट्या अपेक्षित परिणाम मिळेल. राजकीय क्षेत्रात तप्त झालेले वातावरण थंड होईल. कौटुंबिक जबाबदारी योग्य रीतीने पार पाडाल. जीवनसाथीसोबत करमणूक करताना बोलण्याचा सूर घसरू देऊ नका. ध्यानधारणा व योगसाधनेत मन गुंतवा. आरोग्याची ठेवण ठणठणीत असेल. शुभ दिनांक : २८, २९ महिलांसाठी : घरगुती कामात मग्न राहाल.
-
योग्य तो निर्णय घ्या : पौर्णिमा व्ययस्थानातून होत आहे. सैरभैर झालेल्या मनाला सावरा. मानसिक संतुलन हरवून कोणतेही काम होत नाही, हे विसरू नका. त्याचा मनस्ताप स्वत:लाच होतो. दोन शब्द कमी बोलून शांतच राहण्याचा प्रयत्न करा. नोकरदारवर्गाने आगामी गरज लक्षात घ्या. एक हातचा राखून ठेवण्याचा निर्णय उत्तम ठरेल. प्रात्यक्षिक कामाचा बोजवारा कमी होईल. कामाच्या ठिकाणी योग्य तो निर्णय घ्या. अंगवळणी पडलेल्या व्यवसायात थोडे धीराने घ्यावे लागेल. इतरांच्या सल्ल्याने व्यवसायात गुंतवणूक करणे टाळा. आर्थिक वाटचाल टप्प्याटप्प्याने वाढत राहील. सामाजिक कल उंचावला तरी इतरांच्यात हस्तक्षेप करणे टाळा. घरगुती वातावरण उत्साही ठेवण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. संतुलित आहार घ्या व आरोग्य जपा. शुभ दिनांक : २५, १ महिलांसाठी : मनामध्ये घोळत असलेले विचार इतरांशी मन मोकळेपणाने व्यक्त करा.
-
कामात मग्न राहा : पौर्णिमा तुमच्या लाभस्थानातून होत आहे. मनोरंजनात्मक गोष्टींचा कल वाढेल. सहकाऱ्यांसमवेत जुन्या गोष्टींच्या संवादातून आनंद व्यक्त होईल. नोकरदारवर्गांची कामावर होत असलेली गैरसोय कमी होईल. छोट्या-मोठ्या गोष्टींचा आढावा घेऊन उत्तम समतोलता साधाल. बौद्धिक कौशल्याच्या चातुर्यावर उत्तम नेतृत्व पार पाडण्याची संधी मिळेल. व्यावसायिकदृष्ट्या कामात मग्न राहा. प्रत्येक बाबीमध्ये सकारात्मकता वाढवा. उद्योग-व्यवसायात मागील थकबाकी यांचा विचार करा. हिशोबाचे ताळतंत्र चुकणार नाहीत याची दक्षता घ्या. राजकीय क्षेत्रातील डावपेच यशस्वी होतील. जुन्या मैत्रीचे संबंध दृढ होतील. मुलांसोबत करमणुकीचे कार्यक्रम आयोजित कराल. धर्मपत्नीची साथ राहील. धार्मिक गोष्टीतील उत्सुकता निर्माण होईल. प्रकृतीबाबत निष्काळजीपणा टाळा. शुभ दिनांक : २५, १ महिलांसाठी : खर्चावरती नियंत्रण ठेवा.
-
गुंतागुंतीचे प्रश्न सुटतील : चंद्राचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होत आहे. पौर्णिमा दशमस्थानात होत असून, कार्यक्षमतेत वाढ होईल. नोकरदारवर्गाला स्थिरता प्राप्त होईल. प्रलंबित कामांवर वरिष्ठांशी चर्चा होईल. या चर्चेतून निघालेला सुवर्णमध्य कामाच्या ठिकाणी गैरसोय कमी करणारा ठरेल. व्यवसायामध्ये मागील काही गुंतागुंतीचे प्रश्न सुटतील. त्यामुळे पुढील नियोजन करणे अवघड होणार नाही. उधार-उसनवारी वसूल होईल. आर्थिकदृष्ट्या होत असलेली भरकट कमी झाल्याने, व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न सफल होतील. सार्वजनिक क्षेत्रात पुढारीपणा करणे आवडेल. मुलांचे नको ते लाड करणे टाळा. स्थावर मालमत्तेर्ची चिंता मिटेल. घरामध्ये मोठ्या सदस्यांचे वर्चस्व राहील. शरीर प्रकृती उत्तम राहील. शुभ दिनांक : २५, २९ महिलांच्या : मनाची लवचीकता वाढेल.
-
नियोजित कामांना गती : चंद्र ग्रहाची अनुकूलता उत्तम राहील. पौर्णिमा भाग्यस्थानातून होत आहे. इच्छा-आकांक्षा दुहेरी मार्गावर असतील. नवीन संकल्पनांना वाव मिळेल. नोकरदारवर्गाची विस्कळीत झालेली घडी रुळावर येण्याच्या मार्गी असेल. नियमांचे पालन करीत कार्यक्षेत्राची अंमलबजावणी करा. बदलणारे स्वरूप तुमच्यासाठी प्रेरणा देणारे असेल. त्यातूनच बरेच काही शिकून पुढे जा. व्यवसायात दुहेरी भूमिका करावी लागेल. अपेक्षित व्यक्तीकडून मदत मिळाल्यामुळे हलके वाटेल. स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरू लागतील. वैद्यकीय क्षेत्रात नियोजित कामांना गती मिळेल. आर्थिकदृष्ट्या तारेवरची कसरत कमी होईल. राजकीय क्षेत्रात स्वतङ्मचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावणे योग्य ठरणार नाही. नातेवाईकांविषयी आपुलकी वाटेल. शारीरिकदृष्ट्या प्रकृतिस्वास्थ्य उत्तम राहील. शुभ दिनांक : ३०, १ महिलांसाठी : ठरवलेला उद्देश सफल होईल.
-
धरसोडपणा कमी होईल : अष्टमस्थानातून पौर्णिमा होत आहे. मानसिक कणखरपणा वाढवा, नको त्या गोष्टीचे धाडस या कालावधीत करणे टाळा. प्रकृतिस्वास्थ्य जपून शांत राहण्याचा प्रयत्न करा. नोकरदार व्यक्तीने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत गुंतू नका. शासकीय कर्मचाऱ्यांना परिश्रमाचे मोल मिळेल. कामांमधील धरसोडपणा कमी होईल. उद्योगधंद्यातील चलनवलन होण्यास मदत होईल. व्यवसायामध्ये आजच्यापुरता विचार करणे इष्ट ठरेल. घडणाऱ्या परिवर्तनाचे निरीक्षण योग्य पद्धतीने करा. अर्थार्जनाचा मार्ग मोकळा करण्यासाठी निष्काळजीपणा करून चालणार नाही. सार्वजनिक क्षेत्रात वेळेला महत्त्व द्या. नातेवाईकांना तुमच्या मदतीची अपेक्षा असेल. घरगुती स्तरावर धार्मिक कार्य करण्याची आवड राहील. मानसिक दडपण घेणे टाळा. आरोग्याचे पथ्यपाणी सांभाळा. शुभ दिनांक : ३०, १ महिलांसाठी : आहे त्या परिस्थितीत राहण्याचा प्रयत्न करा.

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL