-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका मांडली. तसेच, करोनाचे संकट अद्याप टळले नाही, या विरोधातील भारताची लढाई सुरूच असल्याचे देशवासियांना सांगितले.
-
२१ जूनपासून देशातील सर्व राज्यातील १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकार राज्यांना मोफत लस उपलब्ध करून देईल. अशी मोदींनी घोषणा केली.
-
देशात सध्या सात कंपन्या करोना प्रतिबंधक लसीचं उत्पादन करत आहेत. तीन लसींच्या चाचण्या सुरु आहेत, अशी माहिती मोदींनी दिली.
-
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत नोव्हेंबर २०२१ पर्यंत मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीपर्यंत ८० कोटी गरीबांना मोफत धान्य दिलं जाणार आहे. असंही यावेळी मोदींनी सांगितलं.
-
खासगी रुग्णालयांमध्ये लसीच्या किंमतीपेक्षा केवळ १५० रुपये अधिक घेऊन लस दिली जाणार. अशी दिलासा देणारी बातमी पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली.
-
देशात उत्पादित होत असलेल्या लशींपैकी २५ टक्के लस खासगी रुग्णालयांना दिली जाणार आहे, असं मोदी म्हणाले.
लस निर्मात्यांकडून एकूण लस उत्पादनापैकी ७५ टक्के लस केंद्र सरकार स्वतः खरेदी करून राज्यांना देणार. -
देशात नेसल व्हॅक्सिनवर संशोधन सुरू आहे. नजीकच्या काळात या लसीवर यश मिळालं तर भारताच्या लसीकरण मोहीमेस आणखी गती येणार. असं मोदींनी बोलून दाखवलं.
-
. १८ वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणासाठी लागणाऱ्या लशींचा साठा केंद्र सरकार मोफत करणार आहे.

शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘अशी चिक मोत्याची माळ’ गाण्यावर डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक