-
पुणे महानगरपालिकेच्या सर्व साधारण सभेमध्ये आज नगरसेवकांनीच करोनासंदर्भातील नियम मोडल्याचं चित्र पहायला मिळालं.
-
करोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने पुणे शहराचे नियम शिथिल करण्यात आले. मात्र मागील अनेक महिन्यांपासून पुणे महानगरपालिकेची सर्व साधारण सभा ऑनलाईन घेतली जात होती.
-
पुणे शहराचे नियम शिथिल झाल्याने, सभागृह चालविण्यास परवानगी शासनाकडून मिळाली आहे.
-
आज पुणे माहानगरपालिकेची सर्व साधारण सभा घेण्यात आली.
-
मात्र या सभेमध्ये अनेक नगरसेवकांनी मास्क न घालता बसले होते.
-
इतकच नाही तर या सभेमध्ये नगरसेवकांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन केलं नसल्याचंही दिसून आलं.
-
काही नगरसेवक तोंडावरील मास्क काढून आरामात बसलेले,
-
काही महिला नगरसेवक सोशल डिस्टन्सिंग विसरुन अशाप्रकारे एकमेकांशी गप्पा मारत होत्या.
-
अनेक नगरसेवक सोशल डिस्टन्सिंग विसरुन अगदी एकमेकांना खेटून बसलेले.
-
अनेकांनी मास्कच घातले नव्हते. त्यामुळे पुणेकरांकडून करोना नियमांचे पालन करण्याची अपेक्षा कऱणाऱ्या नगरसेवकांनी कृतीतून आदर्श घालून देण्याची गरज असल्याची चर्चा रंगल्याचं पहायला मिळालं.

हरतालिकेचा साध्य योग तुमच्या राशीला करणार का श्रीमंत? इच्छापूर्तीसह तुमचे बरेच प्रश्न लागतील मार्गी; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य