-
आज संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पादुका (पालखी) पंढरपूरकडे एसटीने प्रस्थान ठेवणार आहेत.
-
८० वारकरी आणि मानकरी, देवस्थान विश्वस्त या पालखीसोबत असणार असून दोन बसमधून हे सर्वजण प्रवास करणार आहेत.
-
पालखी सोहळा गेल्या साडेतीनशे वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. आजही कोरोनाच्या संकटात मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने संपन्न होत आहे, असं मत सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलं आहे.
-
लवकरात लवकर कोरोना संकटातून मुक्ततता मिळू दे आणि पहिल्यासारखं पायी वारी होऊ दे असं साकडं आपण घातलं तसेच पूर्वी प्रमाणे जनजीवन होवो, अशी प्रार्थना नतमस्तक होऊन केल्याचं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं.
-
जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुका एसटी ने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत.
-
१ जुलै रोजी तुकोबांचा पालखी सोहळा मुख्य मंदिरात पार पडला असून प्रस्थान ठेवले होते.
-
दरम्यान, करोनाच संकट असल्याने यावर्षी देखील पालखी मुख्य मंदिरात विसावल्या होत्या.
-
तर, आज एसटीमधून ग्यानबा तुकाराम म्हणत टाळ मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत.
-
१ जुलै पासून देहूच्या मुख्य मंदिरात गोल रिंगण, मेंढ्यांच रिंगण, अश्वाच रिंगण असे सोहळे पार पडले आहेत.
-
हे सर्व सोहळे दरवर्षी पंढरपूरच्या दिशेने पायी वारी जाते तेव्हा पार पडत असतात.
-
परंतु, यावर्षी देखील करोनाच संकट असल्याने मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे.
-
आज सकाळी मुख्य मंदिरात प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी इनामदार वाड्यात टाळ मृदंगाच्या गजरात पोहचली.
-
यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
-
तिथे पादुकांची आरती करून झाल्यानंतर एसटीमध्ये पादुका विसावल्या.
-
तुकोबांचा जयघोष करत ग्यानबा तुकारामाने परिसर दुमदुमून गेला होता.
-
एसटीमधून पादुका पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत.
-
एसटींची विशेष सजावट करण्यात आली आहे.
-
संपूर्ण बस फुलांनी सजवण्यात आलेली.
-
पालखी प्रस्थानाच्या वेळेस भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला.

Vaishnavi Hagawane Case: अजित पवारांचा वैष्णवीच्या वडिलांना फोन; धीर देताना म्हणाले, “मुलीला नांदवायचे नव्हते तर…”