-
मुंबईत बांधकाम सुरु असणारी चार मजली इमारत तीन घरांवर कोसळल्याची घटना आज मुंबईत घडली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पाच जणांना अग्रिशमन दलाच्या अधिकारी-जवानांनी चार तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बाहेर काढलं. (सर्व छायाचित्रं। एएनआय)
-
जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. (छायाचित्र।एएनआय)
-
मुंबईत मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अंधेरी पश्चिममधील जुहू गल्ली परिसरात ही घटना घडली. अमर सोसायटीमध्ये एका १+३ असं चार मजल्याच्या इमारतीचं बांधकाम सुरु आहे. बांधकाम सुरू असलेलीह ही इमारत समोरच्या तीन घरांवर कोसळली.
-
इमारत कोसळल्यानं घरांच्या ढिगाऱ्याखाली पाच लोक अडकली होती. मुंबई अग्निशमन दलाचा जवानांनी धाव घेऊन पाच जणांना बाहेर काढलं. सर्व जखमींना जवळच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.
-
रेस्क्यू ऑपरेशननंतर ढिगारा बाजूला करण्याचं काम मुंबई अग्निशमन दलाचे जवान आणि मुंबई महानगर पालिकेच्या जवानांकडून करण्यात आलं. (सर्व छायाचित्रं। एएनआय)
‘७ नवीन आणि सुंदर लढाऊ विमानं पाडली’, डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संघर्षावर टिप्पणी