-
पुण्यातील नांदेड फाटा येथील एका कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली असून या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.
-
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या दाखल असून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.
-
अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड फाटा येथे केकवरील शोभेची दारु तयार करण्याची एक कंपनी आहे.
-
सकाळच्या सुमारास कंपनीमध्ये १२ ते १५ कामगार होते.
-
सव्वा दहाच्या सुमारास काम सुरू असताना, अचानक धूर येण्यास सुरुवात झाली.
-
कामगारांना काही समजण्याच्या आत कंपनीमध्ये आगीने रौद्र रूप धारण केले.
-
त्यामुळे सर्व कामगार बाहेर पळत सुटले. मात्र दोन कामगार आतमध्ये अडकून पडले.
-
या सर्व घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी काही मिनिटात दाखल झाले.
-
आतमध्ये अडकलेल्या एका व्यक्तीला बाहेर काढून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.
-
तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे असे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (सर्व फोटो : आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)

Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते…; पाहा, जपानी लोकांच्या प्रतिक्रिया