-
पंढरपूर : ज्याच्या दर्शनाची आस लागली होती त्या सावळ्या विठुरायाचे मुख दर्शन भाविकांना घेता आले.
-
आज सकाळी ६ वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले.
-
दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मंदिर समितीच्या वतीने पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. करोनाचे सर्व नियम पाळून मंदिर उघडण्यात आली आहेत.
-
आज आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
-
“भेटी लागे जीवा लागलीस आस” या अभंगाप्रमाणे लाखो भाविकांना विठुरायाच्या दर्शनाची आस लागली होती.
-
दि. ५ एप्रिल २०२१ रोजी राज्यातील सर्व मंदिरे करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्या नंतर आज राज्यातील मंदिरे उघडण्यात आली आहेत.
-
राज्य सरकारने करोनाचे नियमांचे पालन करून मंदिरे उघ्द्न्यास परवानगी दिली. या पार्श्वभूमीवर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने संपूर्ण मंदिर, दर्शन रांग येथे स्वच्छता आणि निर्जानातुकीकरण केले.
-
मुख दर्शनासाठी कासार घाट येथे तापमान तपासणे, सँनिटायझर देवून रांगेत पाठविले जात आहेत.
-
येथील नामदेव पायरी येथे आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. तसेच पुण्यातील राम जांभूळकर या भाविकाने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. यात तुळस, झेंडू, गुलाब, अष्टर, शेवंती, जरबेरा, कागदा, कामिनी. या फुलांचे १० ते १५ र्न्ग्संग्ती वापरण्यात आली आहेत.
-
श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा गाभारा तसेच मंदिरात हि साज्वात करण्यात आल्याची माहिती गुरव यांनी दिली आहे. तर आज देवाचे नित्योपचार ठरलेल्या वेळेत करण्यात आले. त्या नंतर सकाळी ६ वाजता मंदिराचे दार उघडण्यात आले.
-
रांगेतील पहिल्या भाविकांचे समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व मंदिर समितीच्या कर्मचार्यांनी पुष्पवृष्टी करीत स्वागत केले. तसेच प्रातिनिधिक पहिल्या ५ भाविकांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
-
दर्शनाला येणार्या भाविकांनी करोनाच्या नियमाचे पालन करावे.
-
स्थानिक नागरिकांसाठी रोज सकाळी ६ ते ७ या कालावधीत दर्शनाची सोय समितीने केली असल्याची माहिती सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
-
तर विठ्ठलाच्या दर्शनासाठी बीड वरून आलेल्या महिला भाविकाने देवाचे दर्शन मिळाल्यावर भावनिक होत दोन हात जोडत खूप समाधान झाले असे म्हणत दोन्ही डोळे भरून आले.
-
आता करोनाचे संकट दूर कर अशी प्रार्थना देवापुढे केल्याचे येथील चंद्रकांत भागानगरे या भाविकाने केली. असे असले तरी आता देवाचे दर्शन होणार या भावनेने भाविक समाधानी दिसून आले.

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल