-
२२ ऑक्टोबर १९४७ ला पाकिस्तानने काश्मिर खोऱ्यात घुसखोरी केली. २६ ऑक्टोबरला जम्मू आणि काश्मिर या संस्थानचे राजा हरिसिंह यांनी भारतात विलीनीकरण करण्याबाबत स्वाक्षरी केली.
-
२४ तासात भारतीय लष्कराने वेगाने हालचाल करत २७ ऑक्टोबरला श्रीनगर विमानतळावर सैन्य उतरवण्यास सुरुवात केली. भारतीय वायू दलाच्या १२ नंबरच्या स्क्वॉड्रन मधील मालवाहू ‘डाकोटा’ विमान हे शीख रेजिमेंटच्या जवानांना घेऊन श्रीनगर विमानतळावर उतरले.
-
या जवानांनी मोर्चेबांधणी करत श्रीनगर विमानतळ सुरक्षित केला. त्यानंतर एकामागोमाग एक वायू दलाच्या विमानांनी लष्कराच्या विविध तुकड्या विमानतळावर उतरवायला सुरुवात केली.
-
यामुळे मोठ्या प्रमाणात भारतीय लष्कराच्या तुकड्या श्रीनगरला पोहतल्या, जवानांनी आगेकुच करत पाकिस्तानी घुसखोरांना लगाम घातला, त्यांना मागे ढकलले, काश्मिर सुरक्षित केले.
-
लष्कराच्या या धडक कारवाईची आठवण म्हणून भारतीय लष्कर २७ ऑक्टोबर हा दिवस Infantry Day म्हणून साजरा करतो.
-
या मोहिमेत भारतीय वायू दलाच्या ‘डाकोटा’ या मालवाहू विमानांनी अप्रतिम कामगिरी बजावली. वायू दलाने अशा फोटोंसह श्रीनगरच्या त्या मोहिमेच्या आठवणी ताज्या केल्या.
-
२५ पेक्षा जास्त जवान आणि त्यांच्या लष्करी साहित्याला घेत एका दमात १५०० किलोमीटर अंतर पार करण्याची डाकोटा विमानांची क्षमता होती. आता ही विमाने वायू दलातून निवृत्त झाली असली तरी एक विमान Heritage म्हणून अजुनही कार्यरत ठेवण्यात आले आहे.

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…