-
नेहमी आपल्या रोखठोक वक्तव्यांनी विरोधकांच्या टीकेचा सामना करणारे शिवसेना खासदार संजय राऊत सध्या आपल्या लेकीच्या लग्नाच्य तयारीत व्यस्त आहे.
-
संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊतचं सोमवारी २९ नोव्हेंबरला लग्न होणार आहे.
-
मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने संजय राऊत यांनी संगीत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
-
रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
-
यावेळी सुप्रिया सुळे यांचं कुटुंबही हजर होतं.
-
संगीत कार्यक्रमात संजय राऊतांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत ठेका धरला. दोघांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
-
यावेळी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतदेखील उपस्थित होत्या. सुप्रिया सुळेंनी आग्रह केल्यानंतर त्यांनीदेखील डान्स करत आनंद लुटला.
-
संजय राऊत यांची कन्या पूर्वशीचा विवाह ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी होणार आहे.
-
हरहुन्नरी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी यावेळी ‘दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे, जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने’ हे अष्टविनायक चित्रपटातील गीत ऐकवलं असता संजय राऊत भावूक झाल्याचं चित्र पहायला मिळालं.
-
(Photos: Facebook/Twitter)
४८ तासानंतर भरपूर पैसा मिळणार, सुखाचे दिवस येणार! कोजागिरी पोर्णिमेला चांदीसारखे चमकेल ‘या’ राशींच्या लोकांचे भाग्य, दारी नांदणार लक्ष्मी