-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा विवाहसोहळा पार पडला आहे.
-
एकीकडे अनेक नेते मोठ्या थाटामाटात आपल्या मुलांची लग्नं लावत असताना जितेंद्र आव्हाड यांनी मात्र अत्यंत साध्या पद्धतीने मुलीचं लग्न लावलं.
-
रजिस्टर पद्धतीने हे लग्न पार पडलं.
-
रजिस्टर पद्धतीने करण्यात आलेल्या या लग्नात काही मोजकेच पाहुणे उपस्थित होते.
-
नताशा आव्हाड ही जितेंद्र आव्हाडांची एकुलती एक कन्या आहे.
-
नताशा आव्हाडचं लग्न एलन पटेलसोबत झालं असून दोघे आज विवाहबंधनात अडकले.
-
बँडबाजा, वरात असा कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्दतीने पार पडलेल्या या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
-
जितेंद्र आव्हाड यांनी यानिमित्ताने इतर लोकप्रतिनिधींसमोर आदर्श ठेवला असल्याचंही अनेकजण सांगत असून कौतुक करत आहेत.
-
मुलीच्या विवाहसोहळ्यावेळी जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचं पहायला मिळालं.
-
वडिलांच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून नताशा आव्हाडही भावूक झाली होती.
-
प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
-
“२५ वर्ष आपल्या अंगा-खांद्यावर खेळलेली मुलगी आपल्या घरात नसणार ही भावना खूप वेदनादायी आहे,” असं सांगताना जितेंद्र आव्हाड यांनी अश्रू आवरत नव्हते.
-
एका बापाने अशावेळी काय बोलायचं? असं सांगताना ते भावूक झाल्याचं पहायला मिळालं.
-
“कितीही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला तरी ते होत नाही, कारण घरात दिसणारी, बागडणारी, कधीतरी अंगावर धावून येणारी, ओरडणारी आता घरात नसणार…घरातील घरपण गेल्यासारखं असेल,” हे अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.
-
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरलाही फोटो शेअर केले असून शुभेच्छा दिल्या आहेत.
-
जा मुली तू जा दिल्या घरी तू सुखी रहा…बाबुल कि दुआये लेती जा..जा तुझको सुखी संसार मिले अशी कॅप्शन देत त्यांनी फोटो शेअर केले आहेत.
-
दरम्यान एलन ख्रिश्चन असून नंतर त्यांच्या पद्धतीने विवाह पार पडेल असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे (Photo: Video Screenshot/Twitter)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case