-
संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत प्रवास करत असलेलं Mi- 17V5 हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याने संपूर्ण देश हादरला आहे. इतक्या मोठ्या पदावरील अधिकाऱ्याच्या हेलिकॉप्टरची दुर्घटना झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
-
या हेलिकॉप्टरमधून बिपिन रावत हे वेलिंग्टनला निघाले होते. तिथे सैन्यादलातील प्रशिक्षणार्थींशी ते संवाद साधणार होते.
-
हेलिकॉप्टरमधून बिपिन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी तसंच इतर १४ वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
-
बिपिन रावत जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीसंबंधी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
-
तामिळनाडूत कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना झाली. या दुर्घटनेनंतर तेथील स्थानिकांनी सर्वात प्रथम बचावकार्यासाठी धाव घेतली होती.
-
या घटनेचे साक्षीदार असणारे कृष्णस्वामी यांनी इंडिया टुडेशी बोलताना संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
-
“मी सर्वात प्रथम खूप मोठा आवाज ऐकला. काय झालं आहे हे पाहण्यासाठी मी बाहेर आलो तर हेलिकॉप्टर झाडावर आदळत असल्याचं मी पाहिलं. यानंतर आग लागली आणि ते अजून एका झाडावर आदळलं,” अशी माहिती त्यांनी दिली.
-
यावेळी दोन ते तीन लोक हेलिकॉप्टरमधून बाहेर येताना दिसले. ते पूर्णपणे भाजले होते आणि खाली जमिनीवर कोसळले असंही त्यांनी सांगितलं.
-
यानंतर मी तात्काळ तिथे जवळ राहणाऱ्यांना मदतीसाठी आवाज दिला असं कृष्णस्वामी यांनी सांगितलं.
-
तोपर्यंत अग्निशमन दल आणि आपातकालीन सेवांना कळवण्यात आलं होतं असंही ते म्हणाले.
-
हवाई दलाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत
-
IAF MI-17V5 या श्रेणीतलं हे हेलिकॉप्टर होतं. लष्करातील किंवा इतर कोणत्याही व्हीआयपींच्या प्रवासासाठी अशा प्रकारच्या हेलिकॉप्टर्सचा वापर केला जातो. त्यामुळे या हेलिकॉप्टर्समध्ये सर्व प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजनांची काळजी घेतली जाते.
-
दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र खराब हवामान किंवा तांत्रिक कारणामुळे दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
-
बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची माहिती मिळताच सर्व नेत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करत असल्याचं ट्विट केलं आहे.
-
दिल्लीत कॅबिनेट बैठकीदरम्यान केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घटनेची माहिती दिली.
-
केंद्र सरकारकडून गुरुवारी संसदेत यासंबंधी निवेदन दिलं जाणार आहे.
-
(Photos: ANI/Video Capture)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल