-  
  भारतीय संरक्षण दलांचे प्रमुख बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर कोसळून निधन झाल्यानतंर चीनने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली असून या दुर्घटनेसाठी भारतीय लष्करातील त्रुटी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
 -  
  चीनने ग्लोबल टाईम्समधील लेखात बिपिन रावत यांच्या निधनावर बोलताना यातून भारतीय लष्करातील शिस्तीची कमतरता तसंच लढण्याची अपूर्ण तयारी दिसत असल्याचा कांगावा केला आहे.
 -  
  बिपिन रावत यांच्या निधनाने भारतीय लष्कराचं आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नांना मोठा फटका बसला असून हा दीर्घकाळ राहील असंही चीनने म्हटलं आहे.
 -  
  ग्लोबल टाईम्समध्ये यावेळी बिपिन रावत यांचा उल्लेख चीनविरोधी असा करण्यात आला आहे.
 -  
  बिपिन रावत यांच्या निधनानंतरही भारताचा चीन सीमेवरील आक्रमक पवित्रा कायम असेल असं तज्ज्ञांचं म्हणणं असल्याचं ग्लोबल टाइम्सने सांगितलं आहे.
 -  
  भारतीय प्रसारमाध्यमांच्या वृत्तांचा हवाला देताना ग्लोबल टाइम्सने या दुर्घटनेसाठी मानवी चूकच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
 -  
  लष्कर तज्ज्ञ Wei Dongxu यांच्या म्हणण्यानुसार, Mi-17V5 हे Mi-17 ची सुधारित आवृत्ती असून त्यामध्ये अधिक शक्तिशाली इंजिन्स तसंच अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आहेत. यामुळे ते अधिक विश्वासार्ह आहे. पण भारतीय लष्करात अनेक हेलिकॉप्टर्सचा वापर केला जातो. यामध्ये विदेशी तंत्रज्ञान वापरत देशांतर्गत निर्मिती तसंच विकसित करण्यात आलेले तसंच अमेरिका आणि रशियामधून निर्यात करण्यात आलेल्या हेलिकॉप्टर्सचा समावेश असल्याने यामुळे नोंदणी आणि देखभालीत समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
 -  
  आणखी एका चिनी तज्ज्ञाच्या हवाल्याने ग्लोबल टाइम्सने भारतीय लष्करात अनुशासित लष्करी संस्कृती असून अनेकदा भारतीय सैन्य प्रक्रिया तसंच नियमांचं पालन करत नाही असं सांगण्यात आलं आहे.
 -  
  चीनने यावेळी २०१९ मध्ये भारतीय विमानाला लागलेली आग आणि २०१३ मध्ये भारतीय पाणबुडीत झालेला स्फोट यांचा उल्लेख करत या सर्व मानवी चुका असल्याचा दावा केला आहे.
 -  
  नुकतीच झालेली ही दुर्घटना टाळता आली असती. उदाहरणार्थ, जोपर्यंत हवामानात सुधारणा होत नाही तोपर्यंत उड्डाण थांबवलं असतं, पायलटने अधिक काळजीपूर्वक किंवा कुशलतेने उड्डाण केलं असतं किंवा हेलिकॉप्टरची कर्मचाऱ्यांनी योग्य काळजी घेतली असती असं सांगत चीनने पुन्हा एकदा भारतीय लष्करातील त्रुटी असा उल्लेख केला.
 -  
  यावेळी एका तज्ज्ञाने, ही समस्या संपूर्ण भारतीय लष्करात आहे. चीन-सीमेवर तैनात भारतीय सैन्यही नेहमी चिथावणी देण्याचं काम करत असतं असं सांगताना खरं युद्ध झालं तर चिनी लष्करासमोर भारताला काहीच संधी नाही असं म्हटलं आहे.
 -  
  दरम्यान बिपिन रावत यांच्या निधनाने भारतीय लष्कराचं आधुनिकीकरण करण्याच्या योजनेला मोठा फटका बसल्याचं सांगण्यात आलं आहे.
 -  
  बिपिन रावत यांच्या निधनामुळे बेशिस्त लष्करील सरकारचं नियंत्रण सुटू शकतं आणि सीमेवरील स्थिती हाताबाहे जाऊ शकते असं चीनचं म्हणणं आहे.
 -  
  चीन नाही तर मागासलेपण भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे असंही या लेखात सांगण्यात आलं आहे.
 
  अगं बाई! साडीतील काकूंचा ठुमका पाहून थक्क झाले नेटकरी; VIDEO पाहून म्हणाले “आंटी तर लहानपणी…..