-  
  पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील सतत वर्दळीचा लक्ष्मी रोडवर ओपन स्ट्रीट मॉल संकल्पना राबविली गेली आहे
 -  
  तसेच लक्ष्मी रोडवर नो व्हेइकल डे चं आयोजन करण्यात आले. लोकांच्या सवयी बदलाव्यात यासाठी वाहतूक पोलिसांकडून दिवसभर लक्ष्मी रस्त्यावर नो व्हेईकल डे पाळण्यात आला.
 -  
  या उपक्रमाचे उदघाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
 -  
  सकाळी १० ते संध्याकाळी चार या वेळेत खाजगी वाहनांना या रस्त्यावर मज्जाव करण्यात आला आहे
 -  
  तसेच नगरकर तालिम चौक ते उंबर्या गणपती चौक दरम्यान मध्ये ११ ते चा पर्यंत वाहनांची वर्दळ बंद ठेवली जाईल तर पार्किंग देखील नसणार आहे
 -  
  याआधी पादचारी दिनाचे महत्त्व नागरिकांनी समजून घेतले पाहिजे, असे पुण्याच्या महापौरांना याआधी म्हटले होते. त्यानंतर हा उपक्रम राबण्यात आला आहे
 -  
  या उपक्रमाअंतर्गत लक्ष्मी रोडवर लहान मुलांसाठी खेळाचे देखील आयोजन करण्यात आले होते.
 -  
  यावेळी लहान मुलांनी सापशिडीच्या खेळाचा आनंद घेतला.
 -  
  तसेच तरुणांसाठी एका म्युझिक बॅन्डने येथे गाण्याचे सादरीकरण देखील केले.
 -  
  त्यालाही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
 -  
  मात्र यावेळी आम्ही या उपक्रमाचे स्वागत करतो.पण आमच्या ग्राहकांनी वाहने कुठे लावायची असा प्रश्न इथल्या दुकानदारांनी उपस्थित केला
 -  
  आम्हाला कल्पना न देता हा उपक्रम राबविला गेला आहे. आमचा देखील विचार केला पाहिजे होता, अशी तक्रार दुकानदारांनी केली आहे.(सर्व फोटो – सागर कासार)
 
  उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ