-
विशाखापट्टणम वर्गातील( Project-15B) दुसरी युद्धनौका विनाशिका – destroyer, तिचे नाव आहे मुरगाव – Mormugao, yard no – 12705
-
या युद्धनौकेच्या समुद्रातील चाचण्या युद्धस्तरावर सुरू असून याचाच एक भाग म्हणून ही युद्धनौका पहिल्यांदाच खोल समुद्रात चाचण्यांसाठी दीर्घकाळसाठी बाहेर पडली आहे
-
याबद्दलचे फोटो हे नौदलाने प्रसिद्ध केले असून २०२२ वर्षाच्या मध्यात ही युद्धनौका नौदलात दाखल होणे अपेक्षित आहे
-
या युद्धनौकेच्या बांधणीला सुरुवात जून २०१५ मधे झाली, सप्टेंबर २०१६ या युद्धनौकेचे जलावतरण झाले. त्यानंतर आवश्यक उपकरणे, इलेक्ट्रिक वायर, शस्त्रास्त्रांचा मुख्य भाग वगैरे बसवण्यात आले
-
गेले काही महिने मुंबई बंदराजवळच्या समुद्रात युद्धनौकेच्या प्राथमिक चाचण्या सुरू होत्या. ( Harbour trials, shallow water trials )
-
आता पहिल्यांदाच खोल समुद्रात दीर्घकाळच्या चाचण्यांकरता मुरगावचा प्रवास सुरु झाला आहे. युद्धनौकेची कार्यक्षमता, त्यावरील उपकरणे, शस्त्रास्त्रे यांच्या सखोल चाचण्या आता केल्या जातील
Gold-Silver Price : अबब… सोने ९१०० रूपयांनी, चांदी १३००० रूपयांनी स्वस्त ! जळगावमध्ये आता किती दर ?