पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा मोठा अपघात (Bikaner Express Accident) झाल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा अपघात गुवहाटी-बिकानेर एक्सप्रेसला झालाय. -
हा भीषण अपघात पश्चिम बंगालमधील दोमोहानीजवळ झाला आहे.
-
१३ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर येतेय.
-
ट्रेनचे अनेक डब्बे रुळावरुन घसरले आहेत.
-
अनेक प्रवासी अपघात झालेल्या ट्रेनच्या बाजूला उभे असल्याची प्राथमिक दृष्ये समोर आली आहेत.
-
या गाडीच्या १२ डब्ब्यांचा अपघात झाला असल्याची माहिती भारतीय रेल्वेने दिलीय.
-
येथील रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.
-
या अपघातानंतर घटनास्थळी रेल्वेकडून मदतकार्य केलं जात आहे.
-
मेडिकल व्हॅन्सही घटनास्थळी पाठवण्यात आल्यात.
-
अपघात इतका भीषण आहे की रेल्वेचा एक डब्बा दुसऱ्या डब्ब्यावर चढलाय.
-
अपघातामध्ये किती प्रवासी जखमी झालेत अथवा मरण पावलेत याची माहिती पहिल्या एका तासानंतरही समोर आली नव्हती.
-
स्थानिक गावकऱ्यांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतलीय.
-
हा अपघात नक्की कशामुळे झाला याची माहिती समोर आलेली नाही.
-
मागील काही वर्षांमधील हा सर्वात गंभीर अपघातांपैकी एक असल्याचा प्राथमिक दावा केला जातोय. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

४८ तासानंतर भरपूर पैसा मिळणार, सुखाचे दिवस येणार! कोजागिरी पोर्णिमेला चांदीसारखे चमकेल ‘या’ राशींच्या लोकांचे भाग्य, दारी नांदणार लक्ष्मी