-
आज संपूर्ण देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. (फोटो : PTI)
-
भारताचं स्वातंत्र्याचं ७५ वं वर्ष असल्याने हा प्रजासत्ताक दिन विशेष आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून देशवासियांना ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो : PTI)
-
लडाख सीमेवरही इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP) जवानांनी साजरा केला प्रजासत्ताक दिन. (फोटो : ANI)
-
इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी (ITBP) उत्तराखंडमध्ये १४ हजार फुटांवर हाडं गोठवणाऱ्या थंडीत उणे ३० अंश सेल्सियस तापमानात तिंरगा फडकावला. (फोटो : ANI)
-
‘Beating the Retreat’ कार्यक्रमासाठी भारतात निर्मिती करण्यात आलेले १००० ड्रोन कार्यक्रमाचा भाग असणार आहे.
-
पूर्वसंध्येला विजय चौकात या ड्रोन्सच्या सहाय्याने आकाश वेगवेगळे आकार तयार करत प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं.
-
गुगलने प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष डुडल ठेवलं आहे. यामधून भारतीय संगीत संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
-
भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिन निमित्ताने वर्षा निवासस्थानच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
-
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.
-
यावेळी उपस्थित पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामीसह मानवंदना दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना शुभेच्छाही दिल्या.
-
भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते भाजपाच्या दिल्लीमधील मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. (फोटो : ANI)
-
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमर जवान ज्योतीचा फोटो शेअर करत देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
-
प्रजासत्ताक दिनी नागपुरात संघ मुख्यालयात महानगर संघचालक राजेश लोया यांनी ध्वजारोहण केलं. (फोटो : ANI)
-
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून कडक सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. (फोटो : ANI)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल