-
भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं वयाच्या ९२ वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. (फोटो सौजन्य : गणेश शिर्सेकर/एक्स्प्रेस फोटो)
-
लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्तानंतर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय, प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्यासह अनेक दिग्गजांनी अंत्यदर्शन घेतलं.
-
लता मंगेशकर यांचं निवासस्थान असलेल्या प्रभूकुंजवर अनेक दिग्गजांनी अंत्यदर्शनासाठी हजेरी लावली.
-
प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते.
-
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर देखील प्रभूकुंजबाहेर आलेले दिसले.
-
राज ठाकरे आपल्या कुटुंबियांसह प्रभूकुंजवर आले होते. यावेळी अजय गोगावलेसोबत बोलताना ते दिसले.
-
शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रभूकुंजवर येऊन लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन घेतले.
-
बिग बी अमिताभ बच्चन यांनी लता मंगेशकर यांचं प्रभूकुंजवर येऊन अंत्यदर्शन घेतलं.
-
यामुळे प्रभूकुंज या मंगेशकरांच्या निवासस्थानाबाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींचीही मोठी संख्या दिसली.
-
सर्वसामान्य नागरिकांनी देखील लता मंगेशकर यांचं अंत्यदर्शन व्हावं म्हणून प्रभूकुंजबाहेर मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. (फोटो सौजन्य : गणेश शिर्सेकर/एक्स्प्रेस फोटो)
-
गर्दी झाल्याने पोलिसांनी प्रभूकुंजबाहेर बॅरिकेट्स लावले.
-
अनेक सामान्य नागरिक प्रभूकुंजबाहेर उभे राहून लता मंगेशकर यांच्या दर्शनासाठी वाट पाहात होते.

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक