-
प्रत्येक वर्षी १४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीक साजरा करण्यास सुरुवात होते.
-
७ फेब्रुवारी हा दिवस रोझ डे म्हणून साजरा करतात. या दिवशी अनेक प्रेमी आपल्या प्रिय व्यक्तीला गुलाबाचे फुल देऊन आपले प्रेम व्यक्त करतात.
-
गुलाबाच्या फुलाला व्हेंलटाईन डेच्या निमित्त विशेष महत्व आहे. त्यामुळे व्हेंलटाईन डे पर्यंत गुलाबाच्या फुलांना बाजारामध्ये चांगला भाव मिळणार आहे.
-
पुण्याच्या मावळमधील गुलाब दरवर्षी परदेशात पाठवला जातो. यावर्षी मात्र याउलट चित्र असून भारतातील स्थानिक बाजारपेठेत चढ्या दराने गुलाबाच्या फुलाला भाव मिळत आहे.
-
तर १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या व्हेंलटाईन डेसाठी देशभरातील स्थानिक बाजारपेठांमध्ये गुलाब फुलांना मागणी असल्याने शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळत आहेत.
-
यामुळे गुलाब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे.
-
यावर्षी ४० टक्के गुलाब परदेशात तर ६० टक्के हा भारतात विकला जात आहे.
-
हवाई वाहतूक महागल्याने परदेशातील फूल आयातदारांनी भारतीय बाजारपेठेऐवजी आफ्रिकेतील केनिया, इथोपिया या देशातून फुलांची आयात केली आहे.
-
निर्यातीवर परिणाम झाल्याने परदेशामध्ये गुलाबाच्या किमतीमध्ये घट झाली आहे.
-
एका गुलाबाला किमान १५ ते २० रुपये किंमत भारतात मिळत आहे.
-
परदेशात १२ ते १५ रुपयांना गुलाबाच्या फुलांची विक्री होत आहे
-
त्यामुळे यावर्षीचा व्हेंलनटाईन डे गुलाब उत्पादकांसाठी विशेष ठरतोय.
-
तरुण आणि तरुणींना लाल गुलाब आकर्षित करत आहे. तर पांढरा, पिवळा, केशरी हा गुलाब देखील बहुतांश तरुणांना भुरळ घालतोय.
-
गेल्या दोन वर्षांपासून करोनाचा सामना करत गुलाब उत्पादक अनेक संकटातून दिवस काढत आहेत.
-
पण यावर्षी करोनाचा प्रभाव कमी झाल्याने लग्न सोहळे, इतर कार्यक्रमामुळे भारतातील बाजारपेठामध्ये गुलाबाला चांगला भाव मिळाला आहे. (सर्व फोटो- कृष्णा पांचाळ)
महिनाभर दररोज दही खाल्ल्यानं काय होईल? डॉक्टरांनी सांगितलेले परिणाम ऐकून विश्वास बसणार नाही