-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (६ मार्च) पुणे मेट्रोसोबतच इतर काही महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं.
-
मोदींनी स्वत: मेट्रोमधून प्रवास करत नागरिकांना प्रवासासाठी मेट्रो खुली करून दिली.
-
पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनी प्रचंड उत्साह दाखवत दुसऱ्या दिवशीही मेट्रोतून प्रवासासाठी मोठी गर्दी केली.
-
पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील सार्वजनिक वाहतूक सक्षम होण्याच्या दृष्टीने, मागील कित्येक वर्षांपासून बहुप्रतीक्षित असलेला पुण्यातील गरवारे कॉलेज ते आनंदनगर आणि चिंचवड येथील पीसीएमसी ते फुगेवाडी मेट्रो प्रकल्प आज मार्गी लागला आहे.
-
अनेक वर्षांपासून शहरात मेट्रो केव्हा धावणार अशी चर्चा सुरू होती आणि आज ती अखेर धावली.
-
बच्चे कंपनीपासून जेष्ठ नागरिक मोठ्या उत्साहाने मेट्रो स्टेशनमध्ये दाखल झाले होते.
-
अनेक जण मेट्रोच्या आसपास कुटुंबीय किंवा मित्र मंडळी समवेत सेल्फ काढताना दिसत होते.
-
प्रत्येक नागरिक खूप उत्साही आणि आनंदी दिसत होता.
-
‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष नागरिकांमधून ऐकायला मिळत होता.
-
प्रवाशांचा एवढा उत्साह पाहून मेट्रो अधिकार्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.
-
पुणेकर आणि पिंपरी चिंचवड मधील नागरिकांच्या आजचा प्रतिसाद पाहून मेट्रो अधिकार्यांना आणखी झपाट्याने पुढील तयारी करावी लागणार हे निश्चित मानले आहे.
-
पुणेकरांना दररोज सकाळी आठ ते रात्री नऊदरम्यान मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. (सर्व फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)

Vat Purnima 2025 : वटपौर्णिमेनिमित्त जोडीदाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह मैत्रिणींनाही Whatsapp Status, Facebook वर करा शेअर