-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यांच्यावरुन वाद सुरु झाला आहे.
-
पण पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लिम समुदायाकडून आजचा रोजा सोडण्यात आला आहे.
-
सध्या रमजान सुरु असल्याने मुस्लिम समुदायाकडून रोजा पाळण्यात येत आहे.
-
पुण्यातील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरात शुक्रवारी संध्याकाळी मुस्लिम समुदायासाठी इफ्तार पार्टीचे करण्यात आलं आहे
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र माळवदकर आणि भाई कात्रे यांनी या रोजा इफ्तारचे आयोजन केलं होते.
-
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे देखील उपस्थित होते.
-
राज्यभरात मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा वादाच्या पार्श्वभूमीवर आजचा रोजा सोडण्यासाठी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने इफ्तारचं आयोजन केले आहे.
-
साखळीपीर तालीम राष्ट्रीय मंदिरात हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लिम समुदायाने रोजा सोडला
-
पुण्यातील सोमवार पेठेतील या ठिकाणी मुस्लीम पीराचा दर्गा आणि हनुमान मंदिर एकत्रित आहेत. म्हणून या तालमीला साखळीपीर तालीम म्हटलं जातं
-
या हनुमान मंदिराला राष्ट्रीय हनुमान मंदिर हे नाव आहे. मागील ३४ वर्षांपासून इथे हनुमान जयंती दोन्ही समाजाकडून एकत्रित साजरी होते.
-
दरम्यान, भोंग्याच्या आवाजापेक्षा संविधांनाचा आवाज मला पवित्र वाटतो. भोंग्याच्या राजकारणामध्ये देवाला अडकवून नका आणि धर्माला बदनाम करु नका, असे मत श्रीपाल सबनीस यांनी म्हटले आहे. (सर्व फोटो – सागर कासार)
किडनी अन् लिव्हर खराब होणार नाही! फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, हृदयाच्या बंद झालेल्या नसा होऊ शकतात मोकळ्या