-
अतिक अहमद मोहम्मद अशरफ हत्या झाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात तणावाचं वातावरण आहे. पोलिसांच्या ताब्यात असतानाच दोघांची हत्या झाली. (फोटो: स्क्रीन शॉट)
-
अतिक अहमद हे लोकसभेचे सदस्य आणि उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य होते. माजी खासदाराच्या खुनाच्या या प्रकारामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. (फोटो: पीटीआय)
-
अतिक अहमद यांचे भाऊ मोहम्मद अश्रफ हेही अलाहाबाद पश्चिम मतदारसंघातून आमदार होते. (फोटो: सोशल मीडिया)
-
याआधीही अनेक घटनांमध्ये खासदार किंवा आमदार राहिलेल्या नेत्यांची जाहीर हत्या झाली आहे. चला एक नजर टाकूया (फोटो: स्क्रीन शॉट)
-
राजू पाल: २५ जानेवारी २००५ ला अलाहाबाद पश्चिम मतदारसंघातील बसपा आमदार राजू पाल यांची सार्वजनिकरित्या हत्या करण्यात आली. अतिक अहमद आणि मोहम्मद अशरफ यांच्यावर राजू पाल यांच्या हत्येचा आरोप आहे. (फोटो: पूजा पाल fb)
-
जवाहर पंडित: १३ ऑगस्ट १९९६ रोजी अलाहाबादच्या सिव्हिल लाइन्स भागात सपाचे माजी आमदार जवाहर पंडित यांची एके-47 ने गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अलाहाबादच्या दबंग कारवरिया कुटुंबातील अनेक सदस्यांवर या हत्येचा आरोप आहे. (फोटो: ANI)
-
कृष्णानंद राय: २९ नोव्हेंबर २००५ रोजी गाझीपूरमधील मोहम्मदाबाद मतदारसंघातील भाजपचे तत्कालीन आमदार कृष्णानंद राय यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडात आणखी सात मृतदेह पडले होते. (फोटो: सोशल मीडिया)
-
वीरेंद्र शाही: १९९७ मध्ये, यूपीच्या राजकारणात दबंग आमदार म्हणून ओळखले जाणारे वीरेंद्र शाही यांची लखनऊमध्ये भरदिवसा हत्या करण्यात आली. ती हत्या माफिया श्रीप्रकाश शुक्लाने केली होती. (फोटो: सोशल मीडिया)

Air India Plane Crash: एअर इंडिया विमानाच्या अपघातामागे पायलटचा हात? अमेरिकी वृत्तपत्राचा दाव्यावर AAIB म्हणाले…