-
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे भारतातील समुद्र उसळले आहेत. अनेक ठिकाणी उंचच उंच लाटा येत असून वाऱ्याचा वेगही वाढला आहे. केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये बिपरजॉय चक्रीवादळाच्या सतर्कतेमुळे विझिंजम बंदरावर मासेमारी नौका किनाऱ्यावर लावण्यात आल्या. (पीटीआय फोटो)
-
अरबी समुद्रातील भरतीमुळे मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे उंचच उंच लाटा उसळत होत्या. येथे कोस्टल रोडचे काम सुरू असल्याने येथे कामगारही दिसत आहेत. (एपी फोटो)
-
मुंबईतील गिरगाव समुद्रकिनारी धूळ आणि वाळू सर्वत्र पसरली आहे. यामुळे येथून जाणाऱ्या पादचाऱ्यांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्र खवळला आहे. (एपी फोटो)
-
मुंबईचे सर्वच समुद्र आज भरतीच्या लाटांनी उसळलेले दिसत आहेत. त्यामुळे समुद्र किनारी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (पीटीआय फोटो)
-
बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्र किनाऱ्यांच्या कठड्यांवर पाणी आले आहे. परिणामी किनाऱ्या असलेले स्टॉल्स पाण्याखाली गेले आहेत. (पीटीआय फोटो)
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”