-
सध्या भारतातील उत्तर आणि पूर्व भागातील काही राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. या भागांमध्ये उन्हाचा उकाडा अजूनही कायम आहे. देशाच्या राजधानी बद्दल बोलायचं झालं तर इथे रोज उन्हाचं तापमान वाढतच चाललं आहे. (Indian Express)
-
राजधानी दिल्लीमध्ये उन्हाच्या कडाक्याने आणि पाण्याच्या टंचाईने प्रचंड प्रमाणावर नागरिक त्रस्त आहेत. हवामान विभागाने दिल्लीमध्ये रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे. (Indian Express)
-
फक्त मानव जातीवरच नाही तर पशुपक्षी प्राण्यांवरही या भीषण उकाड्याचा गंभीर परिणाम होत आहे. दिल्लीच्या प्राणीसंग्रहालयातील छायाचित्रांमध्ये दिसून येत आहे की काही प्राणी झाडांच्या सावल्या शोधत उन्हाच्या तडाख्यापासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही प्राणी गर्मीपासून संरक्षणासाठी पाण्याच्या डोहांचा आश्रय घेत आहेत. (Indian Express)
-
या छायाचित्रामध्ये दोन पांढऱ्या रंगाचे वाघ सावलीचा आडोसा घेत स्वतःचे उकाड्यापासून संरक्षण करताना दिसत आहेत. (Express photo by Abhinav Saha)
-
या छायाचित्रामध्ये पाणघोडा तापत्या उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पाण्याच्या डोहात बुडालेला दिसत आहे. (Express photo by Abhinav Saha)
-
इंडिया गेट येथील या छायाचित्रात आपण पाहू शकतो एका माकडाने तापत्या उन्हापासून स्वसंरक्षणासाठी एक जुगाड केले आहे. (Express photo by Abhinav Saha)
-
उन्हाच्या चटक्यांना हैराण झालेले हे माकड पाण्यामध्ये उतरून पोहताना दिसत आहे. (Express photo by Abhinav Saha)
-
दरम्यान, दिल्लीतील प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांच्या उन्हापासून आणि गर्मी पासून संरक्षणासाठी अनेक प्रकारचे संसाधनं लावली आहेत. ज्यामध्ये कुलर, बगीचा मधील पाण्याचे फवारे आहेत. तसेच संग्रहालयातील पाण्याच्या तलावांमध्ये पाणी भरून ठेवले आहे जेणेकरून उन्हाच्या गर्मीपासून बचाव करण्यासाठी प्राणी त्यामध्ये जाऊन बसतील. याशिवाय भीषण उन्हाची स्थिती लक्षात घेता प्राण्यांच्या आहारामध्येही बदल करण्यात आले आहेत. (Indian Express)
-
दरम्यान दिल्लीतील नागरिकांना ना दिवसा दिलासा मिळतोय ना रात्री. येथील तापमान जास्तीत जास्त ४५ अंश सेल्सिअस आणि कमीत कमी ३५ अंश सेल्सिअस इतके आहे. (Indian Express)

Bharat Bandh on 9 July 2025 : देशभरात आज २५ कोटी कामगार संपावर! ‘भारत बंद’चा कोणत्या सेवांवर होणार परिणाम?