-
चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील मीझौ शहरात या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनामुळे कमी उंचीची हजारो घरे उद्ध्वस्त झाली, रस्ते आणि पिकांचे नुकसान झाले. दळणवळण आणि वीजपुरवठा खंडित झाला. (REUTERS)
-
ड्रोनने घेतलेल्या या छायाचित्रात आपण पाहू शकतो चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील मेझौच्या जिओलिंग तालुक्यात मुसळधार पावसामुळे शिकू नदीची तटबंदी आणि रस्ते पुराच्या पाण्याने वाहून गेले आहेत. हाँगकाँगच्या सीमेला लागून असलेल्या दक्षिणेकडील ग्वांगडोंग प्रांतात आलेल्या पुरामुळे झालेल्या भूस्खलनात मीझोउ शहरात ५ जणांचा मृत्यू झाला. (REUTERS)
-
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार अजून १५ जण बेपत्ता आहेत. मीझौमधील १ लाख ३० हजारहून अधिक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला असून, काही शहरांचा आणि गावांचा सोमवारपासून (१७ जून) संपर्क तुटला आहे. (REUTERS)
-
९० च्या दशकाच्या तुलनेत चीनमध्ये येणाऱ्या मोसमी पावसाच्या पुरामुळे होणारे नुकसान आणि मृत्यू आता कमी झाले आहेत. संबंधित पूर नियंत्रण विभागाने उपाययोजनांमध्ये आता वाढ केली आहे. तरीही अलीकडच्या काही वर्षांत सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान आणि अतिवृष्टी यामुळे चीनच्या डोंगराळ भागातील शहरे आणि गावांना प्रचंड पूरस्थिती आणि त्यामुळ निर्माण होणाऱ्या भूस्सखलनासारख्या संकटाना सामोरे जावे लागत आहे. (REUTERS)
-
शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार कौंटीमध्ये ३७८ घरे कोसळली आणि ८८० हेक्टर (२१७५ एकर) पिकांचे नुकसान झाले, वुपिंगमध्ये ४१५ दशलक्ष युआन (जवळपास ५ कोटी भारतीय रुपये) एवढे आर्थिक नुकसान झाले आहे. ३ हेलिकॉप्टर आणि २०० हून अधिक बचावपथके नागरिकांना मदत करण्यासाठी बाधित भागात पोहोचले आहेत, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. (REUTERS)
-
अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलन अशा तिहेरी संकटामुळे दक्षिण चीनमध्ये अधिकाऱ्यांनी आपात्कालीन योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. परंतु अनेक नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने आणखीनही लाखो लोकांचे जीवन विस्कळीत होण्याचा धोका आहे. (REUTERS)
-
बीजिंगमध्ये गेल्या वर्षी १४० वर्षांतील विक्रमी पावसाची नोंद झाली होती. बीजिंगमधील उपनगरे आणि जवळपासच्या शहरांमधील हजारो लोकांना शाळा आणि इतर सार्वजनिक इमारतींमधील आश्रयस्थानांमध्ये निवाऱ्यासाठी हलवण्यात आले होते. (REUTERS)
-
गुइलिन शहरातून वाहणाऱ्या ली नदीने धोक्याची पाणीपातळी ओलांडून वाहायला सुरुवात केल्यानंतर दक्षिण-पश्चिम चीनमधील ग्वांग्झीमधील अधिकाऱ्यांनी बुधवारी उशिरा रेड अलर्ट जाहीर केला. सकाळपर्यंत नदीची पाणीपातळी ३.६१ मीटर वर पोहोचली, याबद्दलचे वृत्त चायना डेलीने दिले आहे. (REUTERS)
-
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मंगळवारी यासर्व परिस्थितीवर भाष्य केले आहे. पूर नियंत्रित करण्याचे काम दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे, परंतु असे असले तरीही प्रभावित भागातील खासकरून दक्षिण प्रांतातील नागरिकांसह त्यांच्या मालमत्तेला वाचवण्यासाठी आणि रक्षणासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान चीनच्या राष्ट्रीय हवामान विभागाने आठवड्याच्या शेवटी एक चक्रीवादळ तयार होईल आणि दक्षिणेकडील किनारी भागांवर त्याचा परिणाम होईल अशी शक्यता वर्तवली आहे. (REUTERS)
-
दक्षिण चीनमध्ये मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन किमान ९ जणांचा मृत्यू झाला, संपूर्ण गावांची वीज खंडित झाली आणि शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. दरम्यान चीनचा उत्तरेकडील भाग भीषण दुष्काळ सोसत असताना दक्षिण भागात मात्र पुराने थैमान घातले आहे. (REUTERS) हेही पहा- PHOTOS : संपूर्ण भारतात ‘असा’ साजरा झाला आंतरराष्ट्रीय योग दिवस! पहा हे खास फोटो

हार्ट अटॅक येणार असेल तर तोंडामध्ये दिसतात ‘ही’ ६ लक्षणे; अजिबात दुर्लक्ष न करता लगेच जाणून घ्या