-
आज आषाढी एकादशी आहे.
-
वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची आणि दर्शनाची ओढ लागलेला तो दिवस आज आला आहे. राज्यभरातून लाखो वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी वारी करून पोचत असतात.
-
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दरवर्षी महापूजेचे आयोजन केले जाते.
-
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही पूजा केली जाते, त्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी या महापूजेला कुटुंबियांसह हजेरी लावली.
-
आज आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक विठ्ठलाची महापूजा केली.
-
मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदेही यावेळी उपस्थित होते.
-
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूजाऱ्यांशी संवादही साधला.
-
दरम्यान यावर्षी शासकीय पूजेव्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील आंबेगाव येथील शेतकरी बाळू शंकर अहिरे, ( वय ५५ ) वर्षे, सौ. आशाबाई बाळू अहिरे ( वय ५० ) यांना मानाचा वारकरी म्हणून महापूजेचा मान मिळाला.
-
बा… विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर करण्याचे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाच्या चरणी घातले.
-
(सर्व फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फेसबुक पेजवरून साभार)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक