-
केरळमधील वायनाड येथे मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले असून त्यात १०० हून अधिक लोक अडकले असून २४ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची काही छायाचित्रे समोर आली आहेत, ज्यांना पाहून तिथे काय परिस्थिती आहे याचा अंदाज लावता येतो. ( काँग्रेस केरळ /ट्विटर)
-
आज पहाटे दोनच्या सुमारास दरड कोसळली. यानंतर पहाटे ४.१० वाजता आणखी एक दरड कोसळली. एकूण तीन भूस्खलनाच्या घटनांमुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली असून अजूनही अनेक लोक त्यात अडकले आहेत. ( काँग्रेस केरळ /ट्विटर)
-
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांसाठी बचावकार्य सुरू आहे. परिस्थिती इतकी भीषण आहे की हवाई दलाला तामिळनाडूतून २ हेलिकॉप्टर पाठवावी लागली. ( काँग्रेस केरळ /ट्विटर)
-
या भूस्खलनात जखमी झालेल्यांना वायनाडमधील मेप्पडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ( काँग्रेस केरळ /ट्विटर)
-
भूस्खलनाचे हे चित्र अतिशय भीतीदायक आहे. यावरूनच तिथे परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज येतो. (पीटीआय)
-
NDRF व्यतिरिक्त लष्कराच्या ४ तुकड्याही बचाव कार्यात सहभागी झाल्या आहेत. यामध्ये १२२ इन्फंट्री बटालियन (टेरिटोरियल आर्मी) च्या दोन तुकड्या आणि कन्नूर येथील DSC केंद्राच्या दोन तुकड्यांचा समावेश आहे. (पीटीआय)
-
सुमारे २२५ सैनिक बचाव कार्यात गुंतले आहेत, ज्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. (पीटीआय)
-
वायनाडमधील चुरलमना येथे भूस्खलनानंतर बचाव कार्यात अग्निशमन दल बचाव पथक, नागरी संरक्षण, एनडीआरएफ आणि स्थानिक आपत्कालीन प्रतिसाद दलाचे २५० सदस्य सहभागी आहेत. (पीटीआय)
-
या भूस्खलनानंतर केरळ सरकारने कासारगोड, कन्नूर, वायनाड, कोझिकोड आणि मलप्पुरम या ५ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (पीटीआय)
-
वायनाड हा राहुल गांधींचा लोकसभा मतदारसंघ आहे. २०२४ च्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली होती. नंतर त्यांनी वायनाडची जागा सोडली. या अपघातानंतर राहुल गांधींनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. (पीटीआय)
-
वायनाडमधील भूस्खलनानंतर, आरोग्य विभाग- राष्ट्रीय आरोग्य अभियानाने आपत्कालीन मदतीसाठी एक नियंत्रण कक्ष उघडला आहे आणि हेल्पलाइन क्रमांक ९६५६९३८६८९ आणि ८०८६०१०८३३ जारी केले आहेत. (पीटीआय)

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”