-
वायनाडमध्ये अतिवृष्टीनंतर झालेल्या भूस्खलनात २५६ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. त्यानंतर हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाने कहर केला आहे. (पीटीआय)
-
प्रचंड ढगफुटीमुळे शिमला, मनाली ते कुल्लूपर्यंत भीषण विध्वंस झाला आहे. कुल्लूमधील मणिकर्ण व्हॅली, शिमलाजवळील रामपूर, बुशहरमधील मंडी आणि झाकरी परिसरात एकूण तीन ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. (@Global Tracker/Twitter))
-
ढगफुटीमुळे पाण्यासोबत वाहून आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे तिन्ही ठिकाणचे रस्ते, घरे उद्ध्वस्त झाल्याचे दृश्य दिसत आहेत. नद्यांमधील पाणी तुंबले आहे. (@Global Tracker/Twitter)
-
मुसळधार पावसामुळे मनालीतील बियास नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने चंदीगड-मनाली महामार्ग बंद आहे. किमान ५० हून अधिक लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. (पीटीआय)
-
या आपत्तीत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ढगफुटीमुळे अनेक डझन वाहनेही पाण्यात वाहून गेली. या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. (पीटीआय)
-
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास राजवण गावात विजांच्या कडकडाटासह मोठी ढगफुटी झाली आणि काही वेळातच सर्वत्र पाणीच पाणी झाले. (@Global Tracker/Twitter)
-
त्याचवेळी उत्तराखंडच्या केदारनाथमध्येही ढगफुटीमुळे अनेक लोक अडकले आहेत. हवामान खात्याने उत्तराखंडमध्ये पावसाबाबत अलर्ट जारी केला आहे. एनडीआरएफच्या पथकांनाही अलर्टवर ठेवण्यात आले आहे. (पीटीआय)
-
हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील मणिकर्ण खोऱ्यातील टेकड्यांवर ढग फुटी झाली, त्यामुळे तोश या खाडी परिसरात मोठे नुकसान झाले आहे. रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान, ढगफुटीमुळे स्थानिक लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. (PTI Photo)
-
दरम्यान, नागरिक आणि पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी आणि नदी-नाल्यांजवळ जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे. (PTI Photo)

मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहरे कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला