-
आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
-
दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात अधून मधून जोरदार पाऊस सुरू आहे.
-
मुंबईत दिवसभर कोसळत असलेल्या सरींमुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली.
-
जोरदार पावसामुळे वरळीतील सी लिंक जवळ सखोल भागात पाणी भरलं आहे. मुख्य रस्त्यावर पाणी भरल्यामुळे गाड्या बंद पडत आहेत.
-
मुंबईतील दादर परिसरातील समुद्र चौपाटीवर ५२ किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहत आहेत. वीकेंड आल्यामुळे दादर येथील समुद्र चौपाटीवर मुंबई पोलीस आयुक्तांनी पर्यटकांना फिरण्यास सक्त मनाई केली आहे.
-
याच पार्श्वभूमीवर आज दुपारपासूनच मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळाले.
-
सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले नसले तरी पावसाचा जोर असाच कायम राहिला तर लवकरच सखल भागांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात होईल. याचा परिणाम मुंबईकरांना संकटात टाकू शकतो. मुंबईची लाईफ लाईन लोकल ही विस्कळीत होऊ शकते असं तज्ञांचं म्हणणं आहे.
-
दरम्यान पुढील दोन दिवस राज्यात मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
-
(Photos Source : Express photos by Ganesh Shirsekar)

“मुघलांना विरोध करणारे मराठा साम्राज्य…”, मराठी भाषेच्या वादावर JNU च्या कुलगुरूंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…