-
ग्रीसमध्ये काल (१२ ऑगस्ट) रोजी लागलेल्या भीषण आगीमुळे राजधानी अथेन्सजवळील उपनगरांतून हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. ग्रीसची राजधानी अथेन्स लगतच्या जंगलाला लागलेली आग इतकी भीषण आहे की, आगीच्या काळ्या धुराने आभाळ व्यापले होते. दरम्यान जंगलाच्या वेढ्यात वसलेल्या शहरांना मोठा धोका निर्माण झालेला असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. (AP photo)
-
आगीच्या धुरामुळे आजूबाजूच्या परिसरात काहीच दिसेनासे झाले होते. धुराचा वास हवेत पसरला. वेगाने पसरणारी आग पाहता, ग्रीस सरकारने प्रभावित भागात राहणाऱ्या लोकांना ताबडतोब घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश दिले. (AP photo)
-
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत, मात्र सोसाट्याचा वारा आणि कोरडे हवामान यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होत आहे. (AP photo)
-
भयानक ज्वालांमुळे जवळील रहिवासी इमारती, शाळा आणि उद्योग, व्यवसायांना धोका निर्माण झाला आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाने पूर्ण ताकदीने प्रयत्न सुरू केले आहेत. आगीमुळे मोठ्या प्रमाणावर वनस्पति व जंगल नष्ट झाले असून पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे. (AP photo)
-
अथेन्सच्या आसपासच्या अनेक भागात आग पसरण्याचा धोका वाढला आहे, त्यामुळे शक्य तितक्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. (AP photo)
-
अथेन्स राजधानीच्या उत्तरेस पहिल्यांदा ३२ किलोमीटर अंतरावर असलेल्या वारणावासजवळ सोमवारी आग लागली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आगीने उग्र रूप धारण केले आणि ती सर्वत्र पसरली. (AP photo)
-
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जवळपासची रुग्णालये आणि शहरे तातडीने रिकामी करण्यात आली आहेत. सरकार आणि प्रशासन पूर्ण ताकदीने मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे. अथेन्सच्या जवळ पोहोचत असलेल्या आगीमुळे राजधानीलाही धोका निर्माण होत आहे. (AP photo)
-
बचाव अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि अतिरिक्त मदतीची तयारी केली जात आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि प्रशासकीय पथक आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत, मात्र जोरदार वाऱ्यामुळे परिस्थिती आव्हानात्मक आहे. (AP photo)
-
लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. (AP photo)
-
दरम्यान, यामध्ये आतापर्यंत मृत्यूचे कोणतेही वृत्त आलेले नाही. मात्र १३ लोकांवर धुराच्या संपर्कात आल्याने श्वासोच्छवासासाठी त्रास होऊ लागल्याने उपचार केले जात आहेत आणि दोन अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले आहेत, असे रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (AP photo)

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन; ‘ठरलं तर मग’ मालिकेत साकारत होत्या पूर्णा आजीची भूमिका, सिनेविश्वावर शोककळा