-
उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ आज पहाटे २.३५ वाजता साबरमती एक्सप्रेस रुळावरून घसरली. या अपघातात रेल्वेचे २२ डबे रुळावरून घसरले. (पीटीआय फोटो)
-
हा अपघात कानपूर सेंट्रल ते भीमसेन स्थानकादरम्यान घडला. दिलासादायक बाब म्हणजे या अपघातात घटनास्थळी कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. (पीटीआय फोटो)
-
कानपूरहून साबरमती ट्रेन जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी स्टेशनवर परत जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून बसेसची सोय करण्यात आली. पीटीआय फोटो)
-
इंजिनासमोर बसवलेले बोल्डर इंजिनला आदळल्याने हा अपघात झाला असल्याचे लोको पायलटने सांगितले आहे. (पीटीआय फोटो)
-
बोल्डर इंजिनला आदळताच इंजिनचा कॅटल गार्ड वाकला गेला. त्यामुळे साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे रुळावरून घसरले. (पीटीआय फोटो)
-
दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनेसंबंधी एक्स या प्लॅटफार्मवर पोस्ट लिहित माहिती दिली आहे. रेल्वे रुळावर मोठा दगड आढळून आल्याचे त्यांनी सांगितले आहे. (पीटीआय फोटो)
-
रेल्वेमंत्र्यांनी या संपूर्ण अपघाताची चौकशी करण्याच्या सूचना आयबीला दिल्या आहेत. असा मोठा दगड रेल्वे रुळावर कसा पोहोचला?, याचा तपास केला जाणार आहे. (पीटीआय फोटो)
-
रेल्वे अपघातानंतर जवळपास ६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर ७ गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. (पीटीआय फोटो)

Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..