-
गुरुवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता.
-
शुक्रवारी पहाटेपासूनच मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली. अनेक भागांमध्ये तासाभरात पाणी साचलं.
-
पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले. लोकल ट्रेन सेवेवरही उशिराचा परिणाम झाला.
-
रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे काही BEST बस मार्ग रद्द किंवा वळवण्यात आले.
-
पाण्यात अडकलेल्या वाहनांमुळे ट्रॅफिकची स्थिती गंभीर झाली. नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
-
तसेच आज जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे समुद्राच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
-
नागरिकांना घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, आपत्कालीन परिस्थितीत पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा असे प्रशासनाने म्हटले आहे.
-
(फोटो – गणेश शिरसेकर, इंडियन एक्सप्रेस)

“जेवढं मिळतंय त्यात आनंद मानायला शिका”; आयुष्यात सतत तक्रार करणाऱ्यांनो चिमुकलीचा ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी