-
HSRP Number Plate: केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) अर्थात (उच्च सुरक्षा क्रमांक पाटी) बंधनकारक करण्यात आली आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
वाहनांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर २०१९ पूर्वीच्या वाहनांच्या नंबरप्लेट बदलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता २०१९ पूर्वीच्या वाहनांच्या नंबर प्लेट नागरिकांना बदलाव्या लागणार आहेत. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
त्या पार्श्वभूमीवर सध्या प्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओकडून देखील अंमलबजावणी करण्यासाठी पावलं उचलण्यात येत आहेत. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे. त्यामुळे आता या मुदतीत तुम्हाला तुमच्या २०१९ पूर्वीच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी लागणार आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत असली तरी त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याची माहिती सध्या तरी समोर येत आहे.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
‘एचएसआरपी’ नंबर प्लेटबाबत बसवण्यासाठी याआधी मार्च, एप्रिल आणि जून २०२५ अशा तीन वेळा मुदतवाढ देण्यात आलेली होती. मात्र, त्यानंतर अद्यापही अनेकांनी HSRP नंबर प्लेट बसवलेली नाही. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
‘एचएसआरपी’ नंबर प्लेट बसवण्यासाठी ऑनलाइन बुकिंगमध्ये तांत्रिक अडचणींचा सामना अनेकांना करावा लागत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर तीन वेळा वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
कोणत्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बंधनकारक? : 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना HSRP प्लेट बसवणं बंधनकारक आगे. यामध्ये दुचाकी, तीन चाकी, चारचाकी अशा सर्व वाहनांचा समावेश आहे.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
दरम्यान, हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अर्थात (एचएसआरपी) नंबर प्लेटसाठी बसवण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लख राहिले आहेत. एचएसआरपी नंबर प्लेट बसवली नाही तर दंड भरावा लागू शकतो. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम