-
Vice Presidential Election : जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता उपराष्ट्रपती पदासाठी आज एनडीएच्या उमेदवाराची दिल्लीत घोषणा करण्यात आली आहे. (फोटो-एएनआय)
-
Vice Presidential Election : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची आज दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
सी. पी. राधाकृष्णन कोण आहेत? : राधाकृष्णन हे गेल्या तीन दशकांपासून भाजपाचे सक्रीय सदस्य आहेत. तसेच त्यांनी काही वर्षे तमिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे.(फोटो-एएनआय)
-
सी. पी. राधाकृष्णन हे भाजपाच्या तिकीटावर दोन वेळा तमिळनाडूच्या कोईंबतूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत.(फोटो-एएनआय)
-
२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं होतं. मात्र, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असूनही ते पराभूत झाले होते. (फोटो-एएनआय)
-
२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं होतं. मात्र, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असूनही ते पराभूत झाले होते. (फोटो-एएनआय)
-
१८ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सी. पी. राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. (फोटो-एएनआय)
-
दरम्यान, त्यानंतर दीड वर्षांनी सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे महाराष्ट्रासारख्या बलाढ्य राज्याच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली होती.(फोटो-एएनआय)
-
सी. पी. राधाकृष्णन हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. मात्र, आता सी. पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.(फोटो-एएनआय)