-
Manoj Jarange Patil Education Political Journey: मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. (Photo: Social Media)
-
आंतरवाली सराटीतून सुरु केलेलं त्यांचं मराठा आरक्षण आंदोलन हे आता थेट मुंबईतून सुरू झालं आहे. (Express Photo)
-
आज रोजी (२९ ऑगस्ट २०२५) जरांगे पाटील मराठा बांधवांसह मुंबईत दाखल झाले आहेत. (Express Photo)
-
भगवे झेंडे हाती घेत, भगव्या टोप्या परिधान करत ‘एक मराठा, लाख मराठा’ ही घोषणा देत आंदोलकांनी मुंबईतल्या आझाद मैदानावर हजेरी लावली आहे. (Express Photo)
-
मनोज जरांगे पाटीलही आझाद मैदानावर पोहोचले व त्यांनी आंदोलकांना संबोधित केलं आहे. ‘आपल्यापासून मुंबईकरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या’, असं आवाहन जरांगेंनी केलं आहे. (Photo: Social Media)
-
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचं १२ वी पर्यंत शिक्षण झालं आहे. (Photo: Social Media)
-
“मी खूप माहितीपूर्ण बोलतो म्हणून अनेकांना मी खूप शिकलेलो आहे असं वाटतं पण, मी १२ वी शिकलो आहे. मी वाचन करतो. मला गोरगरीबांच्या अडचणी महत्वाच्या वाटतात, त्यामुळे मी अनेक प्रश्नांची चांगली उत्तर देऊ शकतो, अशी माहिती जरांगे पाटील यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये दिली होती. (Photo: Social Media)
-
दरम्यान, जरांगे पाटील हे मुळचे बीड जिल्ह्यातील मातोरी या गावचे आहेत. परंतु ते मागील काही वर्षांपासून अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे राहतात. (Photo: Social Media)
-
जरांगे पाटील यांची कौटुंबिक पार्श्वभूमी शेतकऱ्यांची आहे. जरांगे पाटलांनी त्यांची काही शेती मराठा समाजाच्या आंदोलनासाठी विकल्याचं त्यांचे सहकारी सांगतात. (Photo: Social Media)
-
ते २०११ पासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लढत आहेत. शिवबा संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मराठा समाजाच्या अनेक प्रश्नांवर आंदोलनं केली आहेत. (Photo: Social Media)

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “सरकार दगाफटका करण्याचा डाव आखत असेल तर…”; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा सरकारला इशारा